Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : देशात साखर उत्पादनात महाराष्‍ट्राची आघाडी कायम

Sugar Season : देशात फेब्रुवारीअखेर २५४ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. ९० लाख टन साखर उत्पादन करत महाराष्ट्राने साखर उत्पादनात निर्विवाद आघाडी घेतली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : ः देशात फेब्रुवारीअखेर २५४ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. ९० लाख टन साखर उत्पादन करत महाराष्ट्राने साखर उत्पादनात निर्विवाद आघाडी घेतली आहे. ७९ लाख टन साखर तयार करत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात साखर कारखाने बंद होण्याचा वेग गेल्या वर्षाच्या तुलनेत मंद आहे. यंदा ७१ साखर कारखाने बंद झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ९३ साखर कारखाने बंद झाले होते.

महाराष्ट्रातील केवळ १३ साखर कारखाने बंद झाले आहेत. गेल्या वर्षी या काळात राज्यातील तब्बल ५८ कारखाने बंद झाले होते. देशाच्या उत्पादनात यंदा महाराष्‍ट्राचा वाटा सर्वाधिक राहील, अशी चिन्हे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशाचा साखर उतारा थोडा अधिक म्हणजे १०.५ टक्के आहे. गेल्‍या वर्षी या कालावधीत तो ९.७८ टक्के होता.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या ५९९ पैकी ४६२ साखर कारखान्यांमध्ये सध्या गळीत हंगाम सुरू आहे. या मध्ये २५५९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या हंगामात या कालावधीत २६५५ लाख टनांचे गाळप झाले होते. २५९ लाख टन साखर तयार झाली होती. कर्नाटकात मात्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर हंगाम संपण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात यंदा ४० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम संपविला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २५ साखर कारखाने बंद झाले होते. कर्नाटकात आतापर्यंत ४५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी ५१ लाख टन साखर तयार झाली होती. गुजरातमध्‍येही गेल्‍या वर्षीच्या तुलनेत लवकर हंगाम संपण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये ६ कारखाने बंद झाले आहेत. गेल्या वर्षी एकही कारखाना बंद झाला नव्हता.

महाराष्ट्र, कर्नाटकात प्रत्‍येकी ५ लाख टने उत्पादन कमी

देशात यंदा साखरेचे उत्‍पादन कमी होण्याचा अंदाज होता. महाराष्ट्रा‍तील ऊस पट्ट्यात अजूनही पूर्ण क्षमतेने साखर कारखाने सुरू आहेत. हंगामापूर्वी महाराष्ट्रातील कारखाने फेब्रुवारीपर्यंत चालतील, असे सांगितले जात होते. परंतु अजूनही खोडवा, निडवा उसाची तोडणी वेळेत होत नसल्याने अजून महिनाभर तरी हंगाम चालेल असे चित्र आहे.

देशात एकूण उत्पादनाच्या तुलनेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये ८५ टक्के उत्पादन होते. सध्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा लाख टनांनी उत्पादन जास्त आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात ते प्रत्‍येकी सुमारे ५ लाख टनांनी कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT