Sugar
SugarAgrowon

Sugar Production : साखर कारखान्यांना मार्चसाठी २३.५ लाख टनांचा कोटा

Sugar Factory Update : केंद्र सरकारने मार्चसाठी देशातील साखर कारखान्यांना २३.५ लाख टनांचा कोटा जाहीर केला आहे.
Published on

Kolhapur News : केंद्र सरकारने मार्चसाठी देशातील साखर कारखान्यांना २३.५ लाख टनांचा कोटा जाहीर केला आहे. गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत हा कोटा दीड लाख टनांनी जादा आहे. संभाव्य उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राने हा कोटा वाढवून दिला आहे. कोटा जादा दिल्याने याही महिन्यात साखर कारखान्यांना साखर विक्री करणे आव्हानात्मक ठरणार आहे.

फेब्रुवारीमध्ये २२ लाख टनांचा कोटा दिला होता. या महिन्यात साखरेला चांगली मागणी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फारशी मागणी नाही यामुळे दरात फार वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

Sugar
Sugar Industry : साखर कारखाने आर्थिक अस्थिरतेकडे

गेल्या दोन महिन्यांत साखरेच्या दरात (Sugar Price) मंदी आहे. संक्रांतीनंतर दर ३४०० रुपये क्विंटलच्या आसपास राहिले. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शीतपेय व मिठाई उद्योगाकडून साखरेला सातत्याने मागणी असते. यामुळे साखरेची उलाढाल मोठी असते. यंदा मात्र साखर बाजारात (Sugar Market) फारशी तेजी दिसत नसल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन (Sugar Production) काहीसे कमी असले तरी केंद्र सरकारच्या धोरणामुळे साखर कारखान्यांकडून जादा प्रमाणात साखर विक्री करणे अनिवार्य ठरणार आहे. अनेक कारखान्यांना गेल्या महिन्यातील साखर विक्री कोटाही अद्याप संपवता आला नसल्याचे चित्र आहे.

केंद्राने मार्चचा कोटा देताना फेब्रुवारीच्या कोट्याला कोणतीही वाढ दिलेली नाही. यामुळे फेब्रुवारीतले कोटे तसेच शिल्लक राहणार आहेत. केंद्राने दिलेल्या कोट्याच्या ९० टक्के साखर विकली नाही तर कारवाईचा बडगा उभारण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्चमध्येही कोट्याइतकी साखर विकण्याचे मोठे आव्हान आता साखर कारखान्यांपुढे उभे ठाकणार आहे.

Sugar
Sugar Production : राज्यातील साखर उत्पादन घटलं, ७२ लाख ३७ क्विंटलने कमी

महाराष्ट्रासारख्या (Maharashtra )राज्यात अजूनही एक ते दोन महिना साखर हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील दोन महिने तरी मुबलक साखर तयार होईल अशी चिन्हे आहेत. यामुळे कमी उत्पादन असूनही साखर टंचाई जाणवण्याची शक्यता नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर कारखान्यांना कमी दरातच साखर विकावी लागणार असल्याने कारखानदार अस्वस्थ आहेत.

केंद्र सरकारने मार्चसाठी जादा कोटा दिल्याने साखरेचे दर कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. कारखान्यांनी जादा प्रमाणात साखर विक्रीस काढल्यास याचा विपरित परिणाम साखर दरावर होऊ शकतो. हे कारखान्यांना परवडणारे नाही.
पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com