कोल्हापूर ः सणासुदीच्या दिवसांमुळे साखरेची मागणी (Sugar Demand Increased Due To Festive Season) वाढल्याने केंद्रानेही सप्टेंबरच्या स्थानिक विक्री कोट्यात (Sugar Sale Quota) वाढ केली आहे. सप्टेंबरसाठी २३.५० लाख टन साखर विक्रीचा (Sugar Sale) कोटा सरकारने देशातील ५०३ कारखान्यांना दिला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत दीड लाख टनांनी हा विक्री कोटा अधिक आहे. गणेशोत्सव, दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेला मोठी मागणी असण्याची शक्यता गृहीत धरून केंद्राने विक्री कोटा वाढवून दिला आहे. साखरेच्या किमती (Sugar Rate) क्विंटलला सध्या ३५०० ते ३६०० रुपयांच्या दरम्यान आहेत.
सणासुदीमुळे साखरेला मागणी कायम असल्याचे साखर कारखानदारांनी सांगितले. गेल्या एक ते दीड महिन्यापासून सातत्याने साखरेच्या मागणीत वाढ आहे. केंद्रीय अथवा संबंधित राज्य सरकारनेही कोणत्याही निर्बंधांविना सण उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे कारखान्यांना दिलेला साखर विक्री कोटा संपवण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे केंद्रीय सूत्रांचे म्हणणे आहे.
जूनपर्यंत साखर मागणी स्थिर होती. या कालावधीत दर ३२०० इथे ३३०० रुपयांच्या आसपास होते. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू मागणी वाढू लागली यानंतर दरातही १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली. यामुळे केंद्राने ऑगस्टमध्ये २२ लाख टनांचा कोटा साखर कारखान्यांना दिला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही २२ लाख टन साखरेचा कोटा कारखान्यांना दिला होता. परंतु गेल्या वर्षी कोविडचे सावट असल्याने कारखान्यांना सणासुदीचे दिवस असूनही साखर विक्री करणे अडचणीचे बनले होते. यंदा परिस्थिती सुधारल्याने गेल्या सप्टेंबर पेक्षाही यंदा दीड लाख टनांनी साखर कोटा वाढवून दिला आहे. सध्या तरी मागणी असल्याने साखर विक्री बाबत फारशी अडचण नसल्याचे साखर कारखानदारांनी सांगितले.
साखरेचे ३० ऑगस्टचे दर असे
प्रतिक्विंटल रुपये
कोल्हापूर ३५८१
कोलकाता ३८४२
मुजफ्फरनगर ३७२३
कानपूर ३८४५
नवी दिल्ली ३७९१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.