Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : कोल्हापूर विभाग साखर उत्पादनात राज्यात अव्वल

कोल्हापूर विभागाने २६ लाख टन साखर तयार केली आहे. या खालोखाल पुणे विभागाने १०.८ टक्के उतारा मिळवत २२ लाख टन साखर तयार केली.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Sugar Season Update कोल्हापूर ः राज्यातील साखर हंगाम गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल सहा पट वेगाने संपत आहे. सोलापूर व कोल्हापूर विभाग प्रत्येकी २२९ लाख टन ऊस गाळप (Sugarcane Crushing) करीत ऊस गाळपात संयुक्तपणे आघाडीवर आहेत.

कोल्हापूर विभागाने मात्र साखर उताऱ्यात (Sugar Recovery) निर्विवाद वर्चस्व राखत ११.१२ टक्के साखर उतारा मिळविला. याच बरोबर राज्यात साखर उत्पादनात (Sugar Production) पहिला क्रमांक मिळविला आहे.

कोल्हापूर विभागाने २६ लाख टन साखर तयार केली आहे. या खालोखाल पुणे विभागाने १०.८ टक्के उतारा मिळवत २२ लाख टन साखर तयार केली.

सोलापूर विभागाने ८.९५ टक्के साखर उताऱ्याने २० लाख टन साखर तयार केली. सर्वात कमी साखर उत्पादन ०.३ लाख टन (३.४५ लाख क्विंटल) इतके झाले आहे. उताराही सर्वात कमी म्‍हणजे ७.२२ टक्के इतका राहिला आहे.

२३ मार्च अखेर १४५ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. गेल्‍या वर्षी याच कालावधीत केवळ २३ कारखाने बंद झाले होते.

पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड विभाग वगळता अन्य विभागांतील गाळप हंगाम ९० टक्केहून अधिक आटोपला आहे. नागपूर विभागातील सर्व साखर कारखाने बंद झाले आहेत.

यंदाच्या हंगाम समाप्‍ती करणारा नागपूर पहिला विभाग ठरला आहे. सोलापूर विभागातील ५० पैकी ४४ कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूर विभागातील ३६ पैकी ३५ कारखाने बंद झाले आहेत.

२३ मार्चअखेर राज्यात १०३९ लाख टन ऊस गाळप झाले होते. ९.९६ च्या सरासरीने १०३ लाख टन साखर तयार झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ११०० लाख टन उसाचे गाळप झाले होते.

१०.३७ च्या सरासरी उताऱ्याने ११४ लाख टन साखरेचे उत्‍पादन झाले होते. छत्रपती संभाजीनगर विभाग राज्याच्या इतर विभागाच्या तुलनेत धीम्या गतीने सुरु आहे. या विभागात यंदा २६ साखर कारखाने सुरु झाले होते.

यापैकी ९ साखर कारखाने बंद झाले आहेत. नगरमध्‍ये २८ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. यापैकी १४ कारखाने अद्याप सुरु आहेत. पुणे विभागात ३२ साखर कारखान्यांपैकी १७ कारखाने अद्याप सुरू आहेत.

उद्दिष्टाइतके नाही गाळप

हंगामाच्या शेवटी शेवटीही साखर उताऱ्यात फारशी वाढ दिसून आली नाही. राज्यातील साखर उताऱ्याने यंदा १० टक्केचा पल्ला ही ओलांडला नसल्याचे चित्र आहे. गेल्‍या हंगामात सातत्याने १० टक्‍केच्या वर साखर उतारा होता.

यंदा मात्र अपवाद वगळता बहुतांशी साखर कारखान्यांचे गाळप उद्दिष्टा इतके झाले नाही. यामुळे हंगामाच्या शेवटी शेवटी शिफ्‍ट मध्येही कपात करावी लागली.

राज्यात अजूनही ६५ कारखाने सुरु

मार्चअखेर कोल्हापूर, सोलापूर, अमरावती या विभागांतील साखर कारखाने पूर्ण बंद होतील, अशी शक्यता आहे. राज्यात २१० पैकी अजूनही ६५ साखर कारखाने सुरु आहेत. हे कारखानेही फार गतीने साखर उत्पादन करत असल्याचे चित्र नाही. यामुळे येत्या पंधरा दिवसांत आणखी ५ ते ६ लाख टन साखर तयार होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT