Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : साखर उत्पादनासह उताऱ्यात कोल्हापूर विभागाची आघाडी

Sugar Season 2024 : राज्याच्या गळीत हंगामात कोल्हापूर विभागाने साखर उत्पादन व उतारा या दोन्‍ही विभागांत अग्रक्रम मिळविला आहे

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : राज्याच्या गळीत हंगामात कोल्हापूर विभागाने साखर उत्पादन व उतारा या दोन्‍ही विभागांत अग्रक्रम मिळविला आहे. शुक्रवारअखेर (ता. १२) १०.५४ टक्के उतारा मिळवत या विभागाने ११ लाख टन साखर तयार केली आहे.

कोल्हापूरसह, पुणे, सोलापूर विभागांत थोडासा फरक वगळता ऊसगाळप समान होत आहे. तिन्‍ही विभागांत प्रत्येकी १११ ते ११२ लाख टनांच्या दरम्यान उसाचे गाळप होत आहे.

राज्यात एकूण ऊस गाळप ५१५ लाख टन झाले. साखर उत्पादन ४७ लाख टन झाले. गेल्‍या वर्षीच्या तुलनेत अद्यापही १० लाख टन साखर उत्पादन कमी आहे. राज्याचा सरासरी उतारा ९.२ टक्के आहे. सर्वांत कमी उतारा नागपूर विभागाचा केवळ ३.६७ टक्के आहे.

यंदा ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर सोलापूर व पुणे विभाग साखर उत्पादनात आघाडीवर होते. शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे या विभागात ऊस तोडणी मंदगतीने सुरू होती. हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने कोल्हापूर विभाग साखर उत्पादनात आघाडीवर आला. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत राज्याच्या साखर उताऱ्यातही वाढ झाली आहे.

कोल्हापूर खालोखाल पुणे विभागाचा साखर उतारा ९.४५ तर अहमदनगर विभागाचा साखर उतारा ८.९८ टक्के आहे. सोलापूर विभागाचा उतारा ८.४८ टक्के आहे. यंदा गेल्‍या वर्षीच्या तुलनेत उसाचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज होता.

पण सध्या हंगाम सुरू होण्‍याअगोदर उत्पादन घट अपेक्षित धरली होती तितकी उसाच्या उत्पादनात घट होत नसल्‍याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. नोव्‍हेंबरमध्ये झालेल्या पावसाने यंदाच्या अंदाजापेक्षा काहीसे उत्पादन अधिक येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र घट निश्चित झाली असल्‍याचे कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले.

तोडणी क्रमाकडे कारखान्‍यांचे दुर्लक्ष

काही कारखाने वगळता बहुतांश कारखान्यांचे लागवडीच्या तारखेनुसार असलेल्या उसाच्या तोड क्रमापाळीकडे दुर्लक्ष होत असल्‍याने ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत तोडणी होत नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्यांचा ऊस पडलेला आहे. त्याची तोड करण्‍यास नकार देण्‍याचे प्रकार वाढत आहेत.

प्रसंगी आर्थिक तडजोडी करून ऊस कारखान्‍याला पाठविण्याचा मनस्ताप उत्पादकांना सहन करावा लागत असल्याचे चित्र ऊस पट्ट्यात आहे. यामुळेच अनेक शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीच्या तारखा पुढे जात आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस उत्पादन कमी होण्याचा अंदाज असला तरी त्या प्रमाणात तोडणी मात्र वेगात होत नसल्याचे चित्र आहे. कारखाना व्यवस्थापनांनी याकडे गांभिर्याने लक्ष देऊन उस तोडणी वेळेत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ऊस उत्‍पादकांमधून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crops: यंदा थंडीचा कडाका रब्बी पिकांना असह्य?

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज कायम

Urea Shortage : युरियाचा कमी वापर करा, ८०० रुपये मिळवा, आंध्र प्रदेशला असा निर्णय का घ्यावा लागला?

Village Rehabilitation: मसाळा गावातील केवळ २८८ घरांचेच पुनर्वसन शक्य 

AI in Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे माती, पिकांची आरोग्य तपासणी

SCROLL FOR NEXT