Mahesh Gaikwad
देशातील साखर हंगामाने वेगाने सुरू आहे. ३१ डिसेंबरअखेर देशातील ५११ कारखान्यांनी १२२३ लाख टन ऊसाचे गाळप केले असून ११२ लाख टन साखर उत्पादित केली आहे.
यंदाच्या साखर हंगामात साखर उत्पादनात देशात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.
राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी ४२७ लाख टन उसाचे गाळप केले असून ३८.२० लाख टन साखर उत्पादन केले आहे.
साखर उत्पादनात महाराष्ट्राशी स्पर्धा असलेल्या उत्तर प्रदेश साखर उत्पादनात दुसऱ्या स्थानावर आहे.
उत्तर प्रदेशमधील १२० कारखान्यांनी ३५९ लाख टन उसाचे गाळप करून ३४.६५ लाख टन साखर उत्पादन केले आहे.
तर कर्नाटकातील ७३ कारखान्यांनी २६४ लाख टन ऊस गाळप करून २४ लाख टन साखर उत्पादित केली आहे.
३१ डिसेंबरअखेर महाराष्ट्राने उत्तर प्रदेशच्या साखर उत्पादनापेक्षा चार लाख टनांनी अधिक गाळप केले आहे.
देशात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३१ डिसेंबरअखेर साखर उत्पादन ९ लाख टनांनी कमी झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत १२१ लाख टन साखरनिर्मिती झाली होती.