Bharit Vange Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bharit Vange : भरताचे वांगे १० ते १२ रुपये किलो

Latest Agriculture News : राज्यासह परदेशात पोहोचलेल्या जळगावच्या भरताच्या वांग्यांचे दर यंदा कमी आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : राज्यासह परदेशात पोहोचलेल्या जळगावच्या भरताच्या वांग्यांचे दर यंदा कमी आहेत. आवक अधिक असून, शेतकऱ्यांना बाजार समितीत सध्या १० ते १२ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.

सध्या बाजार समितीत रोज २५ ते २७ क्विंटल भरताच्या वांग्यांची आवक होत आहे. ही आवक जळगाव तालुक्यातील नशिराबाद, बेळी, जळगाव खुर्द, भुसावळातील वरणगाव, पिंपळगाव, तळवेल, जामनेरातील हिंगणे व परिसर, एरंडोल, भडगाव आदी भागांतून होत आहे. यंदा सुरुवातीलाच आवक अधिक आहे.

हिरवी गोलाकार, मोठ्या आकारातील वांगी बाजारात येत आहेत. मागील हंगामात भरताच्या वांग्यांची आवक सप्टेंबरमध्ये कमी होती. अतिपाऊस व कीड-रोग यात मागील वेळेस पीकहानी झाली होती. यंदा मात्र पीकहानी कमी आहे.

तसेच लागवडदेखील अधिक आहे. यामुळे आवकही अधिक आहे. जळगाव बाजार समितीत सर्वाधिक आवक होत आहे. अद्याप यावल, रावेरातील चमकदार, लांबट व आकाराने मोठ्या भरताच्या वांग्यांची आवक सुरू झालेली नाही.

या वांग्यांना मोठी मागणी असते. या भागातील वांगी यंदा ऑक्टोबरच्या मध्यात काढणीवर येतील, असे दिसत आहे. यावलमधील बामणोद, पाडळसे, भालोद, न्हावी, आमोदे बुद्रुक, सांगवी बुद्रुक, किनगाव या भागांत भरताची वांग्यांचे पीक अधिक असते. रावेरातील मस्कावदसीम, मस्कावद बुद्रुक, वाघोदा, चिनावल, रोझोदा, खिरोदा आदी भागांत भरताच्या वांग्यांचे पीक जोमात असते. यंदाही या भागात पीक आहे.

अनेकांनी रोपवाटिकांमधून रोपांची खरेदी करून भरताच्या वांगी पिकाची लागवड जूनमध्ये केली होती. तर काहींनी पारंपरिक वाणांचा उपयोग करून आपल्या शेतात रोपवाटिका तयार केल्या व त्यातील रोपांचा उपयोग करून लागवड केली होती. आगाप लागवड जूनच्या सुरुवातीलाच केली जाते. तर नियमित किंवा मुख्य हंगामातील लागवड जुलैच्या अखेरीस केली जाते.

यंदा जिल्ह्यात सुमारे ३०० हेक्टरवर लागवड झाली आहे. लागवड ५० ते ६० हेक्टरने वाढली आहे. बाजारात आवक अधिक आणि उठाव कमी आहे. कारण भरताच्या वांग्यांची मागणी दिवाळीनंतर किंवा हिवाळ्यात अधिक असते. याच काळात दरही अधिक मिळतात, असे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : घुंगशी प्रकल्पावरून सिंचनासाठी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा

Solapur APMC : सोलापूर बाजार समितीतील १० अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द

Cotton Crop : कापूस प्रक्षेत्र दिवसानिमित्त शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत प्रत्यक्षिके

Agriculture Transport : शेतीमाल वाहतुकीतून रेल्वेला एक कोटीचा महसूल

Maharashtra Election 2024 : सरकारने देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट करून ठेवली

SCROLL FOR NEXT