Mohol News: चालू रब्बी हंगामात मोहोळ तालुक्यात विविध पिकांची सरासरी १०० टक्के पेरणी झाली असून, गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या कडक थंडीमुळे गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांना जीवदान मिळाले असल्याने ही पिके जोमात आहेत. चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने व पेरण्या उशिरा झाल्याने ज्वारी उत्पादनात घट येण्याची चिन्हे आहेत..मोहोळ तालुक्यात चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने व सीनानदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महापुरामुळे जमिनी खरडून गेल्याने पेरणी कशावर करावी?.Rabi Sowing: तेवीस लाख ४२ हजार हेक्टरवर रब्बी पेरा.असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडला आहे. जादा पाऊस झाल्याने काळ्या कसदार व वाफ्याच्या जमिनींना वाफसा आला नाही. सर्रास अशी परिस्थिती असल्याने जसा वापसा होईल तशा पेरण्या सुरू झाल्या. गहू हरभऱ्याची ही तीच परिस्थिती झाली आहे..तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे चारा पीक म्हणून मका पिकाची १६१ टक्के पेरणी झाली आहे. त्यामुळे काही अंशी चाऱ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. सध्या मोहोळ तालुक्यात चार साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे उसाच्या वाड्याचा चारा म्हणून वापर होत आहे..Rabi Season: बळीराजाला आता रब्बीतून उभारीची आशा.गेल्या पंधरा दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे ही थंडी कांदा, गहू, ज्वारी, हरभरा या पिकाला अत्यंत पोषक आहे. वाफसा आल्याने आता ऊसतोडणी ही वेगात सुरू झाली आहे. दरम्यान शासकीय आकडेवारीनुसार तालुक्यात तीळ, जवस व सूर्यफूल या पिकांची झिरो टक्के पेरणी झाल्याने ही पिके हद्दपार झाली म्हणले तरी वावगे ठरणार नाही..तालुक्यातील पिकांची स्थितीपीक सरासरी क्षेत्र लागवडीचे क्षेत्र टक्केवारीज्वारी २२ हजार ७६७ १८ हजार ८९९ ८३मका ५ हजार २१७ ८ हजार ३९७ १६१गहू ३ हजार ६०२ ४ हजार ३४७ १२०.६८हरभरा ४ हजार ३१४ ४ हजार २३९ ९८.२६रब्बी मका : ४ हजार ७३८ हेक्टर कांदा : पेरणी क्षेत्र ५ हजार ३८५ हेक्टरटोमॅटो : लागवड क्षेत्र १ हजार २१३ हेक्टर मिरची - १९९, वांगी-१६८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.