Brinjal Cultivation : वांग्याच्या कोणत्या सुधारित जाती निवडाल?

Team Agrowon

सुधारित किंवा संकरित वाण

वांग्याच्या लागवडीसाठी सुधारित किंवा संकरित वाण निवडताना ठराविक बाबींचा विचार करावा. प्रामुख्याने त्या परिसरातील लोकांची मागणी असणारा वाण तसेच बाजारपेठेत हमखास चांगला भाव मिळणारा वाण निवडावा.

Brinjal Cultivation | Agrowon

सुधारीत व संकरित जातीची निवड

निवडलेला वाण शक्यतो भरपूर उत्पादन देणारा व रोग आणि किड यांना कमी प्रमाणात बळी पडणारा असावा. वांगी पिकाची लागवड करताना प्रामुख्याने सुधारीत व संकरित जातीची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड पध्दत , खत व पाणी व्यवस्थापन व पीकसंरक्षण या बाबी महत्वाच्या आहेत.

Brinjal Cultivation | Agrowon

काटेरी व बिनकाटेरी वाण

महाराष्ट्रात वांगी पिकाच्या बऱ्याच जातींची लागवड केली जाते. वेगवेगळया विभागात रंग व आकारानुसार तसेच काटेरी व बिनकाटेरी अशा विविध जातींची लागवड केली जाते.  

Brinjal Cultivation | Agrowon

मांजरी गोटा    

या जातीचे फळ मध्यम ते मोठया आकाराचे, गोल असून जांभळट गुलाबी रंगाचे असते व त्यावर पांढरे सरमिसळ पट्टे असतात. व फळांच्या देठावर काटे असतात ही जात चवीला रूचकर असून फळे चार ते पाच दिवस टिकू शकतात. या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल मिळू शकते.

Brinjal Cultivation | Agrowon

कृष्णा    

ही संकरीत जात असून झाडे काटक असतात. फळांचा आकार अंडाकृती, रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे पट्टे असतात व फळांच्या देठावर व पानांवर काटे असतात. या जातीचे सरासरी ४०० ते ४५० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.

Brinjal Cultivation | Agrowon

फुले हरित    

या जातीची फळे मोठया आकाराची असतात, ही जात भरीत करण्यासाठी चांगली आहे. या जातीच्या फळाचा रंग फिकट हिरवा व टोकाकडे पांढरे पट्टे असतात. ही जात खरीप हंगामासाठी चांगली आहे. या जातीचे सरासरी २०० ते ४८० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.

Brinjal Cultivation | Agrowon

फुले अर्जुन 

वांग्याची ही संकरित जात आहे.फळे मध्यम आकाराची. फळांचा रंग हिरवा. त्यावर जांभळे व पांढरे पट्टे असतात. फळांचा आकार गोलाकार व थोडासा लांब. देठावर काटे असतात. ही जात खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त आहे. उत्पादन ४५० क्विंटल प्रतिहेक्‍टरी मिळू शकते.   

Brinjal Cultivation | Agrowon
Pritisangam | Agrowon
आणखी पाहा...