Jaggery Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market : यंदाच्या संक्रांतीत वाढला गूळ दराचा गोडवा

Jaggery Rate : यंदाची सक्रांत गूळ दराचा गोडवा वाढविणारी ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुळाची आवक कमी होत असताना संक्रातीच्या अगोदर दहा दिवस आवकेत चांगली वाढ झाली.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदाची सक्रांत गूळ दराचा गोडवा वाढविणारी ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुळाची आवक कमी होत असताना संक्रातीच्या अगोदर दहा दिवस आवकेत चांगली वाढ झाली. आवकेत वाढ झाली असली तरी मागणीही चांगली असल्याने गेल्या दहा दिवसांत गुळाचे दर समाधानकारकच राहिले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत क्‍विंटलला २०० रुपयांची सरासरी वाढ झाली. विशेष म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गुळाच्या आवकेत घट होती. पण १ जानेवारीनंतर मात्र सुरू असणाऱ्या गुऱ्हाळघर मालकांनी जादा आदणे काढून गूळनिर्मिती वाढविली. यामुळे गुळाच्या आवकेतही चांगलीच वाढ झाली. पण मागणी कायमच असल्याने दरात फारशी घट झाली नाही.

गुजरातमध्ये संक्रातीसाठी गुळाला विशेष करून मागणी असते. संक्रातीचे वाण देण्यासाठी गुळाचा प्रामुख्याने वापर होतो. यामुळे यासाठीची खरेदी जानेवारीच्या पहिल्‍या सप्‍ताहापासूनच सुरू होते. यंदा गेल्‍या वर्षीच्या तुलनेत गुळाची आवक महिन्याला १ ते २ लाख गूळ रव्‍यांनी कमी होती. मजूर टंचाई व अन्य कारणांमुळे गुऱ्हाळघरे यंदा कमी प्रमाणात सुरू झाली. याचा परिणाम यंदाच्या गूळ हंगामावरही दिसून आला.

सुरुवातीपासूनच गुळाचे सरासरी ४००० रुपये प्रतिक्विंटलच्या वर राहिले. १०० ते २०० रुपयांचा अपवाद वगळचा गुळाला दर चांगले मिळाल्याचे चित्र होते. उच्च दर्जाच्या गुळास अनेकदा ५५०० रुपयांपर्यंत दर होता.

संक्रातीच्या दरम्यान ५ किलोच्या भेलीची चांगली आवक झाली. या गुळाला ४५०० रुपयांपर्यंत दर होता. दहा किलो गुळाला ४००० तर १ किलो पॅकिंगच्या गुळाला ४२०० रुपयांच्या वर प्रतिक्विंटल भाव मिळाला. डिसेंबरच्या तुलनेत व्यापाऱ्यांनीही या कालावधीत जादा खरेदीस उत्‍साह दाखवला.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून वर्षभर गूळ महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातूनही मिळत असल्याने व्‍यापारी शीतगृहासाठी जादा गूळ खरेदी करण्यासाठी अनुत्सुक असतात. संक्रातीसाठी मात्र जितका खरेदी होईल तितक्या गुळाची विक्री करणे शक्य असल्याने यंदा व्यापाऱ्यांनीही या कालावधीत गूळ खरेदी केला.

त्यामुळेच जादा गूळ येऊन दराचे स्थैर्य राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. दहा किलोबरोबर पाच किलो, एक किलो गुळाला विविध दर असल्‍याने उत्पादकांनीही मागणीनुसार गूळ तयार केला.

अशी राहिली आवक

गेल्या वर्षी १ ते १० जानेवारीअखेर २ लाख ७१ हजार गूळ रव्यांची (दहा किलोचे) आवक होती. यंदा या कालावधीत २ लाख ७१ हजार गूळ रव्यांची आवक झाली. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत १ लाख ३९ हजार गूळ रव्यांनी आवक वाढली. गेल्‍या वर्षी याच कालावधीत १ किलो पॅकिंगचे ६६ हजार बॉक्स आले होते. यंदा १ लाख ४ हजार बॉक्‍सची आवक झाली.

यंदा संक्रात खरेदीच्या कालावधीत गेल्‍या वर्षीपेक्षा दराबरोबर आवकही चांगली राहिली. यामुळे आवक वाढल्यानंतर दरात घसरण हे अनिष्ट सूत्र निर्माण झाले नाही. जेवढी आवक वाढली तेवढी मागणीही वाढल्याने या कालावधीत दर स्थिर राहिले.
- के. बी. पाटील, गूळ विभाग प्रमुख, कोल्हापूर बाजार समिती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT