River Sand Theft: भूम शहरातील बाणगंगा नदीपात्रातून मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. वाळूमाफिया रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नदीपात्रातील वाळू काढत असून महसूल व पोलिस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे..मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील स्मशानभूमी ते गोलेगाव हद्दीपर्यंत बाणगंगा नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे करून वाळूचा उपसा केला जात आहे. हा उपसा प्रामुख्याने मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास केला जातो. नदीपात्रातून काढलेली वाळू ट्रॅक्टर व इतर वाहनांद्वारे शहरातील सुरू असलेल्या विविध बांधकामांवर विक्रीसाठी नेली जात असल्याचे सांगितले जात आहे..Illegal Sand Mining: अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करा .या अनधिकृत वाळू उपशामुळे नदीपात्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून भविष्यात पर्यावरणीय समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच नदीपात्रात मोठे खड्डे पडत असल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह बदलण्याचा आणि अपघाताचा धोका वाढण्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे..Illegal Sand Mining: चांभारवाडीत वाळूमाफियांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’.महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात हा प्रकार सुरू असतानाही संबंधित वाळू माफियांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. .काही नागरिकांच्या मते, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच वाळूमाफियांचे धाडस वाढले असून त्यांचा हा बेकायदेशीर व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे.दरम्यान, महसूल विभाग व पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादानेच हा वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये रंगत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.