Aslam Abdul Shanedivan
दसरा आणि दिवाळी झाल्यानंतर तालुक्यातील गुऱ्हाळघरींची धुरांडी पेटत असतं. पण सध्या तसे चित्र सध्या नाही.
शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळघरे दसरा आणि दिवाळीनंतर सुरू होतात. परंतु सध्या या गुऱ्हाळघरांना ब्रेक लागल्याची स्थिती आहे.
मजुरांची टंचाई, गूळ उत्पादन खर्चात वाढ आणि अपेक्षित दर नसल्याने अनेक गुऱ्हाळघरे बंद होत आहेत.
शिराळा तालुक्यातील कोकरुड, मणदूर, बिळाशी, सागाव, कणदूर, मांगरुळ या भागात नऊ ते दहा वर्षांपूर्वी सुमारे १०० हून अधिक गुऱ्हाळघरे होती.
तालुक्यात दर्जेदार गूळनिर्मितीचा हातखंडा असून गेल्या सहा वर्षांपर्यंत तालुक्यात फक्त ३० ते ४० गुऱ्हाळघरे सुरू व्हायची. पण दर्जेदार गुळाला उठाव नाही.
पण मजुरांची टंचाईमुळे गतवर्षी तालुक्यात अवघी पाचच गुऱ्हाळघरे सुरू झाली.
यंदाच्या गूळ हंगामात मजूर, गुळाला अपेक्षित दर, उत्पादन खर्च यामुळे तालुक्यातील एकदेखील गुऱ्हाळघर सुरू नाही