Jaggery Production : शिराळ्यातील गुऱ्हाळघरांना ब्रेक

Jaggery Production : शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळघरे दसरा आणि दिवाळीनंतर सुरू होतात. परंतु मजुरांची टंचाई, गूळ उत्पादन खर्चात वाढ आणि अपेक्षित दर नाही. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकरी गूळ तयार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
Jaggery Production
Jaggery ProductionAgrowon
Published on
Updated on

Sangli News : शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळघरे दसरा आणि दिवाळीनंतर सुरू होतात. परंतु मजुरांची टंचाई, गूळ उत्पादन खर्चात वाढ आणि अपेक्षित दर नाही. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकरी गूळ तयार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. परिणामी यंदाच्या हंगामात शिराळा तालुक्यात गुऱ्हाळघरांना ब्रेक लागला आहे.

शिराळा तालुक्यातील कोकरुड, मणदूर, बिळाशी, सागाव, कणदूर, मांगरुळ या भागात नऊ ते दहा वर्षांपूर्वी सुमारे १०० हून अधिक गुऱ्हाळघरे होती. तालुक्यात दर्जेदार गूळनिर्मिती करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. दसरा झाल्यानंतर तालुक्यातील गुऱ्हाळघर मालक घरांची दुरुस्ती, मजुरांची जुळवाजुळव यासह इतर कामे हाती घेतात.

Jaggery Production
Jaggery Rate : गुळाचे दर क्विंटलला ४०० रुपयांनी सुधारले

त्यानंतर दिवाळीच्या दरम्यान, गुऱ्हाळघरांवर गूळ निर्मितीसाठी लगबग सुरू व्हायची. गेल्या सहा वर्षांपर्यंत तालुक्यात ३० ते ४० गुऱ्हाळघरे सुरू व्हायची. दर्जेदार गुळाला बाजारात चांगली मागणी असून उठावही होत होता.

गुऱ्हाळ घरात काम करणाऱ्या मजुरांची टंचाई भासू लागली. त्यातूनही गुऱ्हाळघर मालकांनी स्थानिक मजुरांची मदत घेऊन गूळनिर्मिती करण्यास सुरुवात केली. मात्र, मजुरांच्या कमतरतेमुळे गतवर्षी तालुक्यात अवघी पाचच गुऱ्हाळघरे सुरू झाली. अडीच ते तीन टन उसापासून सुमारे २७० किलो गूळनिर्मिती होते. गुळाचा उताराही अपेक्षित मिळत असे.

Jaggery Production
Jaggery Production : गूळ, काकवी, कॅण्डी निर्मितीतून तयार केली ओळख

मात्र, यंदाच्या हंगामात गूळ निर्मितीसाठी लागणारे मजूर मिळाले नाहीत. त्यातच गुळाला अपेक्षित दर मिळत नाही. उत्पादन खर्चही हाती येत नसल्याने दसऱ्यानंतर तालुक्यातील गुऱ्हाळघर मालकांनी गूळ निर्मितीचा उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळघरांना सध्या ब्रेक लागला आहे.

उत्पादन खर्चात वाढ

दोन-तीन वर्षांपूर्वी एक किलो गूळ तयार करण्यासाठी ८ ते ९ रुपये खर्च यायचा. गेल्या वर्षभरापासून गूळ निर्मितीला लागणाऱ्या आणि मजुरांच्या दरात वाढ झाल्याने उत्पादन खर्च प्रतिकिलोस २ ते ३ रुपयांनी वाढला आहे. एका बाजूला उत्पादन खर्च वाढला पण गुळाचे दर वाढले नाहीत. या साऱ्याचा परिमाण गूळ निर्मितीवर झाला आहे.

गूळ निर्मितीसाठी ऊस उपलब्ध आहे. पण मजूरांची टंचाई आणि गूळ निर्मितीचा उत्पादन खर्च यामुळे गूळ निर्मितीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे गुऱ्हाळघर सुरू केले नाही.
गजानन शेटे, गुऱ्हाळघर मालक, कोकरुड, ता. शिराळा, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com