Dry Fruits Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dry Fruits Crisis: भारत-पाक तणावामुळे सुका मेवा महागणार?

India Pakistan Tension: भारत-पाकिस्तान तणावामुळे अफगाणिस्तानातून होणाऱ्या सुक्या मेव्याच्या पुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. परिणामी अंजीर, बदाम, मनुका यांचे दर वाढण्याची शक्यता असून व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही महागाईचा सामना करावा लागू शकतो.

Dhananjay Sanap

Pune News: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला. अफगणिस्तानमधून होणाऱ्या सुका मेव्याच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात देशातील बाजारात सुक्या मेव्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.

अफगाणिस्तान भारताचा प्रमुख सुका मेवा पुरवठादार देश आहे. अफगाणिस्तानमधून सुमारे २० हजार टन सुका मेवा भारतात निर्यात केला जातो. त्यामध्ये जर्दाळू, बदाम, काळे आणि हिरवे मनुके, पिस्ते, अक्रोड यांचा प्रामुख्याने समावेश होतो. सध्या अमेरिकेहून आयात होणारी काही उत्पादने दुबईमार्गे भारतात आणली जातात. भारत-पाकिस्तान संबंध बिघडल्यामुळे अफगाणिस्तानमधील आयातही दुबईमार्गे करावी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होऊ शकते. परिणामी देशांतर्गत बाजारा सुक्या मेव्याचे दर वाढतील, असे आयातदाररांचे म्हणणे आहे.

काबूलहून विमानाने भारताला होणारा मालाचा पुरवठा खोळंबला आहे. त्यामुळे अंजीर आणि मणुक्यासारख्या औषधी मूल्य असलेल्या मालाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत. तर अटारी सीमा बंद झाल्यामुळे रस्तेमार्गे होणाऱ्या मालाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्याही अंदाजे ३० ट्रक सीमेच्या पलीकडे परवानगीविना अडकून पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

देशात लग्नसराईचा काळ आहे. त्यामुळे सुक्या मेव्याला मागणी मोठी असते. ती पूर्ण करण्यासाठी देशातील साठा पुरेसा आहे. परंतु आगामी सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची शक्यता आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान नवीन माल बाजारात येईपर्यंत मागणी अधिक वाढलेली असेल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

सुक्या मेव्याच्या आयात दरात आधीच १० ते १५ टक्के वाढ झालेली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अफगाणमधील सुका मेवा आयातीसाठी इराणमधील चाबहार बंदर हा पर्याय असू शकतो, असे काही जाणकार सांगतात. परंतु या बंदर मार्गाने होणारी वाहतूक एक महिना उशिराने होते. तसेच मालाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रस्ते मार्गाने मात्र तीन ते चार दिवसांत वाहतूक होते. बंदर मार्गाने वाहतूक केली तर वाहतूक खर्चात वाढ होणार आहे.

आयातीचे दर (प्रति किलो)

मामरा बदाम- २ हजार ते २ हजार ५०० रुपये

पिशोरी पिस्ता - ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये

सुके अंजीर- ६०० ते १४०० रुपये

काळे मनुके- २०० ते ३५० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Desi Cow Conservation: स्थानिक गोवंशाच्या संवर्धनासाठी डोळस प्रयत्न आवश्यक

Kolhapur Jilha Bank: परराज्यांतील म्हैस खरेदीसाठी ‘केडीसीसी’कडून ३ लाखांपर्यंत कर्ज, धवलक्रांती योजना सुरु

Animal Vaccination: वेळापत्रकानुसार जनावरांमधील लसीकरण

Animal Care: जनावरातील शस्त्रक्रियेबाबत समज : गैरसमज

Agriculture Success Story: एकी हेच कोसले कुटुंबाचे धन

SCROLL FOR NEXT