Dry Fruits Market : इराण, इजिप्तमधील सुका मेवा, खजुरांचा गोडवा

Dry Fruits and Dates : रमजान सुरू झाल्‍याने वाशीतील एपीएमसीमध्ये सुक्‍या मेव्यासह खजुराची आवक वाढली आहे. इराण आणि इजिप्तमधून आलेले विविध प्रकारच्या खजुरांनी ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
Dry Fruits Market
Dry Fruits Market Agrowon
Published on
Updated on

Ramzan Eid : वाशी : रमजान सुरू झाल्‍याने वाशीतील एपीएमसीमध्ये सुक्‍या मेव्यासह खजुराची आवक वाढली आहे. इराण आणि इजिप्तमधून आलेले विविध प्रकारच्या खजुरांनी ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. अवघ्‍या ८० रुपयांपासून २५०० रुपये किलोपर्यंत भावाने ते उपलब्‍ध आहेत.

रमजानमध्ये मुस्लिमबांधवांकडून रोजे म्हणजे कडक उपवास केले जातात. सूर्यास्तानंतर रोजा सोडताना पाण्यासोबत खजूर खाण्याची पद्धत आहे. त्‍यामुळे सध्या खजुराला विशेष महत्त्व आहे. दिवसभर उपवास केल्यानंतर शरीरातील ऊर्जा परत मिळवण्यासाठी खजूर आणि सुक्या मेव्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते.

Dry Fruits Market
Fruit Farming : कष्टाच्या फळाला यशाचा गोडवा: फळबाग शेतीतून संपन्नता!

एपीएमसीत शनिवारी (ता.१) ८६४ क्विंटल खजुराची आवक झाली. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार त्‍याचा भाव ८० ते २२०० रुपये प्रतिकिलो इतका आहे. ज्यामध्ये कलमी खजूर ७००-१००० रुपये किलो, केमिया खजूर २४०-३५० रुपये किलो, मेडजूल खजूर १२००-१४०० रुपये किलो आणि इराणी खजूर ४००-६०० रुपये किलो भावाने घाऊक बाजारात विक्रीस आहे.

सुक्या मेव्यामध्ये काजू २६८ क्विंटल, बदामाची ७२९ क्विंटलची आवक झाली आहे, याशिवाय भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, मगज, जर्दाळू, अक्रोड यांनाही मोठी मागणी आहे.
रमजानमध्ये बाजारात शेकडो क्‍विंटल खजूर आणि सुका मेवा दाखल झाला असला तरी किमती अधिक असल्‍याचे ग्राहकांचे म्‍हणणे आहे, याशिवाय ऑनलाइन विक्री आणि थेट माल विक्रीमुळे ग्राहक बाजारात येऊन खरेदी करण्यास उत्सुक नाहीत. वाढत्या उन्हामुळेही ग्राहक बाजारात येणे टाळत असल्‍याचे व्यापाऱ्यांचे म्‍हणणे आहे.

खजुराचे भाव (प्रतिकिलो रुपयांत)
अंबर १५०० ते १८००
अजवा १८००
कलमी ७००-१०००
किमिया २४०-३५०
मेडजूल १२००-१४००
इराणी ४००-६००
काजू   ७४०-१०५०
बदाम ७५०-१०००

गतवर्षीच्या तुलनेत खजूर आणि सुक्या मेव्याचे भाव वाढले आहेत. ऑनलाइन विक्रीमुळे ग्राहक बाजारात येऊन खरेदी करत नाहीत. रमजानमुळे ग्राहक बाजारात येतील, अशी आशा आहे. ऑनलाइनपेक्षा बाजारात अधिक दर्जेदार सुका मेवा मिळेल. झैदी, केमिया हे खजूर इराणवरून, तर काही खजूर इराकवरून दाखल झाले आहेत.    
- जयदीप पिसाळ, व्यापारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com