Commodity Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Commodity Market : हळद, तूर, हरभऱ्याच्या दरांत वाढ

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह १३ ते १९ एप्रिल २०२४

कापसाचे सप्टेंबर डिलिव्हरीसाठीचे व्यवहार MCX मध्ये १७ एप्रिलपासून सुरू झाले. कापसाची आंतरराष्ट्रीय मागणी कमी असून, ऑस्ट्रेलियासारख्या देशातील उत्पादन वाढत आहे. त्यामुळे जागतिक किमती घसरत आहेत. भारतातसुद्धा त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

या सप्ताहात हळद, तूर व हरभरा वगळता सर्वच पिकांचे भाव कमी झाले. हळदीने परत उसळी घेतली. या सप्ताहात तिच्या जून फ्यूचर्समध्ये १५.४ टक्क्यांनी वाढ झाली. तूर सुद्धा ७.५ टक्क्यांनी वाढली. हरभऱ्याची आवक गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे; मात्र मागणीसुद्धा वाढती आहे.

१९ एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात १.६ टक्क्याने घसरून रु. ५९,६२० वर आले होते. या सप्ताहातसुद्धा ते २.९ टक्क्यांनी घसरून रु. ५७,९२० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ५७,९६० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव रु. ५८,४६० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ०.९ टक्क्याने अधिक आहेत. कापसाची आवक कमी होत आहे.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात २.६ टक्क्यांनी घसरून रु. १,४५० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या सप्ताहात ०.३ टक्क्याने घसरून रु. २,१९३ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (मे) किमती ३.१ टक्क्यांनी घसरून रु. २,११२ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. २,१३८ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.५ टक्क्यांनी कमी आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. मक्याची आवक कमी होत आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १५,९३३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ८.२ टक्क्यांनी वाढून रु. १७,२४२ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती १५.४ टक्क्यांनी वाढून रु. १८,५८८ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १९,२१० वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ११.४ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ५.३ टक्क्यानी वाढून रु. ६,००० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्यानी वाढून रु. ६,०७५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक वाढती आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ९,२५० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.१ टक्क्याने घसरून रु. ४,७४७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ९,८०० वर आली होती. या सप्ताहात ती ७.५ टक्क्यांनी वाढून रु. १०,५३५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे; मागणीमुळे नोव्हेंबरपासून भाव वाढत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,३५० होती; या सप्ताहात ती रु. १,४०० वर आली आहे. गेल्या तीन महिन्यांत कांद्याची आवक स्थिर आहे; किमती मात्र ८ मार्चपासून घसरत आहेत.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ७५० वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT