आता शेतशिवारात डिझेल इंजिनचा आवाज आणि धूरही निघणार नाहीभारतातील कृषी क्षेत्र आता नव्या हरित क्रांतीच्या दिशेने शेतीत हळूहळू इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचा वापरइलेक्ट्रिक ट्रॅक्टरबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा कमी खर्च.Electric Tractors in Agriculture: भारतातील कृषी क्षेत्र आता नव्या हरित क्रांतीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आता शेतशिवारात डिझेल इंजिनचा आवाज नाही आणि धूरही निघणार नाही. तर आता शेतशिवारात हळूहळू इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचा शांत आवाज ऐकू येऊ लागला आहे. शेतीत इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर होणे हा केवळ तांत्रिक बदलच नाही तर हे भारताचे ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या आणि पर्यावरणीय वचनबद्धतेच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे मानले जाते. .शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जो जवळपास देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला रोजगार देतो. कृषी क्षेत्राचे देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे १८ टक्के योगदान आहे. तरीही, इंधनाच्या वाढत असलेल्या किमती, बेभरवशाचा पाऊस आणि कमी होत असलेल्या नफ्यामुळे शेतीवर ताण वाढला आहे. .Tractor Distribution : सोलापुरात एक हजार अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण.आर्थिकदृष्ट्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे का फायदेशीर?इलेक्ट्रिक ट्रॅक्टरबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा कमी खर्च. डिझेलवर ट्रॅक्टर चालवण्यासाठी जेवढा खर्च येतो, तेवढेच काम इलेक्ट्रिक ट्रॅक्टर २० ते २५ टक्के खर्चात करू शकतो. जरी सध्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची सुरुवातीची किंमत अधिक असली, तरी त्याचा आयुष्यभराचा एकूण खर्च लक्षणीयरीत्या खूप कमी असल्याचे जाणकार सांगतात..Tractor Regulations: ट्रॅक्टरधारकांपुढील नवी आव्हाने.इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे डिझेल भरणे, वारंवार तेल बदली आणि गुंतागुंतीच्या यांत्रिक सर्व्हिसिंगची गरज भासत नाही. या ट्रॅक्टरमध्ये कमी हलणारे भाग असतात, ज्यामुळे त्याचा देखभाल खर्चही कमी असतो. त्यात बिघाड होण्याची शक्यता कमी असते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च असे दोन्ही वाचतो. त्याशिवाय, ग्रामीण भागात सौरऊर्जा आणि ग्रामीण इलेक्ट्रिफिकेशनचा विस्तार झाल्यामुळे, शेतकरी आता त्यांचे ट्रॅक्टर सौर चार्जिंगसह चालवू शकतात. याचाच अर्थ शेती आता हरित आणि स्वावलंबी बनू शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे. .पर्यावरणाचे नुकसान नाहीतज्ज्ञांच्या मते, देशातील कृषी क्षेत्राची थेट आणि अप्रत्यक्षपणे हरितगृह वायू उत्सर्जनात भूमिका आहे. डिझेलवर चालणारी कृषी यंत्रे मोठ्या प्रमाणात CO₂, NOx आणि कणयुक्त पदार्थ उत्सर्जित करतात. ज्यामुळे पर्यावरणासह शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. त्यासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरकडे एक पर्याय म्हणून पाहिले जात आहे, ज्यामुळे टेलपाइप उत्सर्जन पूर्णपणे समाप्त होईल. .स्मार्ट शेतीइलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स हे केवळ इलेक्ट्रिक मशीन्स नसून तर आता ते स्मार्ट शेतीचा भाग आहेत. नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये जीपीएस आधारित लोकेशन ट्रॅकिंग, डेटा अॅनालिटिक्सद्वारे पीक उत्पादकता देखरेख आणि रिमोट ऑपरेशन अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना मातीचे आरोग्य, पाण्याचा वापर आणि पीक व्यवस्थापनाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते..महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पंजाब सारख्या राज्यांनी आधीच त्यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत ईलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा समावेश करण्यासाठी प्रायोगिक प्रकल्पावर काम केले आहे. .आव्हाने काय आहेत?बॅटरीचा खर्च, चार्जिंग पायाभूत सुविधा आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांचा सुरुवातीला होणारा संकोच हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसमोरील प्रमुख अडथळे आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.