Thane News : रोजगारासाठी स्थलांतर ही ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासींची मोठी समस्या आहे. त्यांना स्थानिक पातळीवरच उत्पन्नाचे साधन मिळाले, तर त्यांचे स्थलांतर थांबविणे शक्य आहे. याच संकल्पनेतून आदिवासींना मिळालेल्या वनजमिनींवर श्रमजीवी संघटनेच्या पुढाकारातून बांबूची लागवड केली जात आहे..आगामी तीन वर्षांत या लागवडीतून दोन्ही जिल्ह्यांतील ५७ हजार आदिवासी कुटुंबांना उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे आपसूकच त्यांचे स्थलांतर थांबण्यास मदत होणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी राज्य सरकारने राज्यात बांबू मिशन सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत श्रमजीवी संघटना व विधायक संसद यांच्या पुढाकाराने आदिवासींच्या वनजमिनींवर बांबूची लागवड केली जाणार आहे. .या लागवडीतून आदिवासींना स्थानिक पातळीवरच उत्पन्न सुरू होईल, अशी संकल्पना आहे. दुर्गम भागात राहणारे आदिवासी स्थानिक पातळीवर रोजगार मिळत नसल्याने अन्य भागांत स्थलांतर करतात. या स्थलांतरातून अनेक समस्या निर्माण होतात. बांबू मिशनमुळे हे स्थलांतर थांबेल व आदिवासींना स्थानिक पातळीवरच उत्पन्न मिळू लागणार आहे..Bamboo Farming : वाशीम जिल्ह्यात मनरेगातून बांबू लागवडीला चालना द्यावी .ठाणे आणि मिरा-भाईंदर महापालिकांच्या हद्दीतील सुमारे ३७ गावांतील एक हजार ८२६ आदिवासी शेतकरी ३५१ एकर क्षेत्रावर एकूण दीड लाख बांबूच्या रोपांची लागवड करणार आहेत. त्यापैकी ठाणे महापालिकेच्या हद्दीत येत असलेल्या आदिवासींच्या वनपट्ट्यांवर ५० हजार बांबूंची लागवड झाली आहे. त्यासाठी आवश्यक असलेली बांबूची रोपे ठाणे महापालिकेने पुरवली आहेत. मिरा-भाईंदरमधील आदिवासींच्या जमिनीवरही याच पद्धतीने पुढील वर्षी लागवड केली जाणार आहे..श्रमजीवीच्या पुढाकारातून संगोपनपुढील वर्षी पालघर जिल्ह्यातील आदिवासींना मिळालेल्या वनपट्ट्यांवर दोन कोटी बांबूंची लागवड होणार आहे. यासाठी लागणारी बांबूची रोपे ग्रामीण भागात असलेल्या रोजगार हमी योजनेतून राज्य सरकारकडून घेण्यात येणार आहेत. .Bamboo Scheme: बांबू योजनेसाठी १५३४ कोटी.त्या रोपांची लागवड व संगोपन श्रमजीवी संघटनेच्या पुढाकारातून आदिवासी करणार आहेत. बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंसाठी तीन वर्षांनंतर रोपांची वाढ झाल्यानंतर लागणारा कच्चा माल त्यातून तयार होणार आहे. हा कच्चा माल राज्य सरकारने आदिवासींकडून खरेदी करावा, असे प्रयत्न श्रमजीवी संघटना करीत आहे..बांबू रोपांची लागवडठाणे- - एक लाख २३ हजारपालघर - चार लाख २० हजार.बांबू लागवडीतून आदिवासींना रोजगारही मिळणार आहे, मात्र बांबूची रोपे वेळेत उपलब्ध व्हावीत.- विवेक पंडित, संस्थापक, श्रमजीवी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.