Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीन, हरभरा, मुगाच्या किमतींत वाढ

Commodity Market Update : गेल्या महिन्यात कापसाच्या किमतीत उतरता कल दिसून आला. मका, सोयाबीन, तूर यांच्या किमती वाढत्या होत्या.

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह ४ ते १० नोव्हेंबर २०२३

गेल्या महिन्यात कापसाच्या किमतीत उतरता कल दिसून आला. मका, सोयाबीन, तूर यांच्या किमती वाढत्या होत्या. या सप्ताहात, मागील सप्ताहाच्या तुलनेने, कापूस, मका व सोयाबीन यांच्या आवकेत लक्षणीय वाढ झाली. या वर्षी प्रमुख शेतीमालाच्या मागणीत वाढ दिसून येईल. पुरवठा किती होईल यावर मुख्यतः किमती अवलंबून असतील.

१० नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहातील किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव या सप्ताहात १.२ टक्क्याने घसरून रु. ५६,५६० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव २.२ टक्क्यांनी घसरून रु. ५७,९६० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा २.५ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात १.८ टक्क्याने घसरून रु. १,४४१ वर आले आहेत. फेब्रुवारी भाव रु. १,५३० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५८५ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात रु. २,१७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. २,१५८ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (डिसेंबर डिलिव्हरी) किमती रु. २,१७५ वर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स किमती रु. २,२०१ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.६ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचे हमीभाव रु. २,०९० आहेत. मक्याची देशातील आवक या सप्ताहात ७१ टक्क्यांनी वाढली आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १३,७१९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. १३,४४६ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. १३,५१० वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. १५,७१६ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १६.९ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात ३.८ टक्क्यांनी वाढून रु. ६,२२५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,७५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ५,०५० वर आली होती. या सप्ताहात ती १.८ टक्क्याने वाढून रु. ५,१३८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. सोयाबीनची देशातील आवक या सप्ताहात ३३ टक्क्यांनी वाढली आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात २.४ टक्क्यांनी घसरून रु. १०,८८२ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. गेल्या दोन महिन्यांत तुरीच्या किमती वाढत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ४,३९० होती; या सप्ताहात येथील किंमत रु. ३,४८८ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,००० वर आली होती. या सप्ताहात ती वाढून रु. १,५०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Electric Agricultural Tractors: 'इलेक्ट्रिक ट्रॅक्टर'च्या बदललेल्या नियमांचा शेतकऱ्यांना फायदा काय?

Silkworm Winter Care: चांगल्या उत्पादनासाठी रेशीम किड्यांची थंडीत काळजी आवश्यक

Rural Health Camp: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आरोग्य शिबिर

Livestock Exhibition: वावी येथे प्रथमच पशू प्रदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन

Rabi Crop Insurance: सव्वा लाख शेतकऱ्यांनी भरला रब्बीचा पीकविमा

SCROLL FOR NEXT