Maize Market : खानदेशात मका आवकेत वाढ

Maize Rate : खानदेशात मका आवकेत वाढ झाली आहे. रोज आवक वाढली सुरू असून दरही स्थिर आहेत.
Maize Market
Maize MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात मका आवकेत वाढ झाली आहे. रोज आवक वाढली सुरू असून दरही स्थिर आहेत. विविध बाजार समित्यांत किमान १८००, कमाल २२५० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. पशुखाद्य उत्पादकांसह प्रक्रिया क्षेत्रातून उचल वाढल्याने मकादरात सुधारणा दिसत आहे.

मक्याचे दर मागील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात १५०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. परंतु दरात मागील महिनाभरात सतत सुधारणा झाली असून, कमाल दरपातळी २२०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचली आहे. खानदेशातील मक्यास गुजरात, मध्य प्रदेशातही उचल आहे. तसेच स्थानिक भागातील पशुखाद्य उत्पादक, प्रक्रिया उद्योगातूनही मागणी आहे. मक्याची आवक सतत वाढत आहे.

Maize Market
Maize Sowing : रब्बीत शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल

चोपडा येथील बाजार समितीत सोमवारी (ता. ६) मक्याची ४४०० क्विंटल आवक झाली. तेथे किमान दर १८४०, कमाल दर २२८२ आणि सरासरी दर २००० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला. जळगाव येथील बाजार समितीतही मागील चार ते पाच दिवसांत मक्याची प्रतिदिन सरासरी तीन हजार क्विंटल आवक झाली. जळगावातही कमाल दर २२०० रुपये प्रतिक्विंटल व सरासरी दर २००० रुपये, असे आहेत.

Maize Market
Maize Market : मालेगाव बाजार समितीत मक्याला २३११ रुपये भाव

सध्या खानदेशातील जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबार या बाजार समित्यांत मक्याची आवक होत आहे. नंदुरबारात मक्याची आवक तुलनेत कमी आहे. कारण या भागात उत्पादन कमी आहे. शहादा येथील बाजारातही मक्याची आवक यंदा कमी आहे. कारण या भागातही मका पिकास कमी पावसाचा फटका बसला होता.

सध्या खानदेशातील प्रमुख चार बाजार समित्यांत मिळून मक्याची ११ हजार क्विंटल आवक होत आहे. सर्वाधिक आवक चोपडा व जळगाव या बाजार समित्यांत सुरू आहे. आवकेत मागील पाच ते सहा दिवसांत वाढ झाली आहे. दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी मक्याची साठवणूक केली किंवा मळणी टाळली होती.

जशी दरवाढ दिसू लागली, तशी मळणी करून मका वाळवून तो बाजारात पोहोचविला जात आहे. मका दर टिकून असल्याने अनेक खरेदीदार थेट किंवा शिवार खरेदीदेखील करीत आहेत.

शिवार खरेदीत क्विंटलमागे प्रचलित दरांपेक्षा ४० ते ५० रुपये दर कमी दिला जात आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, यावल, रावेर या भागात मक्याची लागवड अधिक झाली होती. यामुळे या भागातच उत्पादन व आवकही अधिक दिसत आहे. आवक पुढील पंधरवड्यात कमी होईल, असेही संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com