Tur, Chana Arrival Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market : मलकापूरमध्ये हरभऱ्यासह तुरीच्या आवकेत वाढ

Tur Market : मलकापूर बाजार समितीत बुलडाणा जिल्ह्यासह खानदेशमधूनही शेतमाल विक्रीसाठी येत असतो. ही विदर्भातील एक प्रमुख बाजार समिती आहे.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी एक असलेल्या येथील बाजार समितीत सध्या हरभरा, तुरीची आवक अधिक प्रमाणात होत आहे. तुरीला सरासरी ९५७५ रुपयांचा दर मिळत आहे. मलकापूर बाजार समितीत बुलडाणा जिल्ह्यासह खानदेशमधूनही शेतमाल विक्रीसाठी येत असतो.

ही विदर्भातील एक प्रमुख बाजार समिती आहे. सध्या या बाजारात तुरीची कमाल १०३५५ व किमान ८९०० रुपये क्विंटलने विक्री होत आहे. तुरीचा सरासरी दर ९५६५ रुपये आहे. शुक्रवारी (ता.२२) या बाजार समितीत सुमारे १४८५ क्विंटल तुरीची खरेदी-विक्री झाली.

याच बाजारात हरभऱ्याचीही आवक चांगल्यापैकी होत आहे. शुक्रवारी सुमारे साडे सतराशे क्विंटल हरभरा विक्रीला आला होता. त्यास कमाल ५४१५ रुपये आणि किमान दर ५००० रुपये मिळाला. सरासरी ५२५० रुपये दर होता.

दोन्ही डाळवर्गीय पिके असून या भागात खरिपात तुरीचे आंतरपीक घेतले जाते. तर रब्बीत हरभऱ्याचीही लागवड मोठ्या क्षेत्रावर होते. तुरीचा हंगाम गेल्या महिन्यात आटोपला.

दर वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी तुरीची विक्री थांबवली होती. मात्र, दरात फारसा बदल दिसत नसल्याने आता विक्री सुरू आहे. हरभऱ्याचीही अशीच स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Agri Exhibition: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन नऊ जानेवारीपासून

Mango Season: हापूस यंदा एकाच टप्प्यात

Pomegranate Export: डाळिंब निर्यातीला प्रोत्साहन देणार : पणनमंत्री रावल

Maize Production: रब्बीत मक्याच्या क्षेत्रात मोठी वाढ

Bangladesh Rice Procurement: बांगलादेश भारतातून ५० हजार टन तांदूळ खरेदी करणार

SCROLL FOR NEXT