Tur Productivity : तुरीची हेक्‍टरी उत्पादकता नऊ क्विंटलपेक्षा जास्त

Tur Market : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८७ टक्के क्षेत्रावर तुरीची लागवड झाली.
Tur
Tur Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८७ टक्के क्षेत्रावर तुरीची लागवड झाली. यापैकी जालना आणि बीड जिल्ह्यांत पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार तुरीची हेक्‍टरी उत्पादकता ९ क्विंटलपेक्षा थोडी जास्त, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात साडेसहा क्विंटलच्या आसपास आली आहे.

मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात सरासरी २० लाख ९० हजार १९९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २० लाख ६३ हजार ९६० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. सरासरी क्षेत्रामध्ये तुरीचे क्षेत्र १ लाख ४२ हजार २८३ हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात १ लाख २३ हजार ९०४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८७ टक्के क्षेत्रावर पिकाची पेरणी झाली.

Tur
Tur Market Rate : मार्च महिन्यात तुरीचा भाव काय राहू शकतो? सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी काय काय करतंय?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ३५ हजार ७०० हेक्टर होते. त्यापैकी २६७९० हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या तुलनेत ७५ टक्के क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली. तुरीच्या प्राप्त पीक कापणी प्रयोगानुसार, जिल्ह्याची तुरीची हेक्‍टरी सरासरी उत्पादकता ६ क्विंटल ४९ किलो ४८८ ग्रॅम आली आहे.

Tur
Tur, Chana Arrival : अमरावती बाजार समितीत तूर-हरभऱ्याची आवक वाढली

जालना जिल्ह्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ५३३४६ हेक्टर असून, प्रत्यक्षात ४८,४६६ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली. ती सरासरीच्या तुलनेत ९० टक्के होती. फेब्रुवारी अखेरपर्यंत २५२ पीक कापणी प्रयोगांती २५० पीक कापणी प्रयोगाचे तक्ते प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्याचे तुरीचे हेक्‍टरी उत्पादन ९ क्विंटल ७६ किलो आले आहे.

बीड जिल्ह्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ५३ हजार २३७ हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात ४८ हजार ६४८ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली. ती सरासरीच्या तुलनेत ९१ टक्के होती. या जिल्ह्याची तुरीची हेक्टरी उत्पादकता ९ क्विंटल ११ किलो ९६८ ग्राम आली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com