Chana Production : तीन जिल्ह्यांत हरभऱ्याची उत्पादकता हेक्टरी ९ ते १२ क्विंटल दरम्यान

Chana Farming : यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याची सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झाली होती. काढणी अंतिम टप्प्यात असलेल्या हरभऱ्याची हेक्टरी उत्पादकता ९ ते १२ क्विंटल दरम्यान आली आहे.
Chana Farm
Chana FarmAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याची सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झाली होती. काढणी अंतिम टप्प्यात असलेल्या हरभऱ्याची हेक्टरी उत्पादकता ९ ते १२ क्विंटल दरम्यान आली आहे. आजवर घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हरभऱ्याची उत्पादकता सर्वांत कमी तर जालना जिल्ह्यात सर्वांत जास्त आली आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत यंदा प्रत्यक्षात ८ लाख ९१ हजार ८१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. पेरणी झालेल्या या क्षेत्रापैकी जवळपास ३ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली होती.

Chana Farm
Chana Market : खानदेशात हरभरा आवकेत आणखी वाढ

पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ५२ हजार ८६६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत पेरणी झालेल्या ७१ हजार ३३ हेक्टर, जालना जिल्ह्यातील ६७ हजार ६५५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत पेरणी झालेल्या ८४ हजार ५०४ हेक्टर, तर बीड जिल्ह्यात सरासरी १ लाख १६ हजार ३२० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्ष पेरणी झालेल्या १ लाख ८९ हजार ११९ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पिकाचा समावेश आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हरभरा पिकाची काढणी सुरू असून, प्राप्त पीक कापणी प्रयोगानुसार हरभऱ्याची उत्पादकता सर्वांत कमी म्हणजे हेक्टरी ९ क्विंटल ६२ किलो ९०० ग्रॅम इतकी आली आहे. जालना जिल्ह्यात हरभरा पिकाची काढणी सुरू आहे. आजवर कृषी विभागाकडून घेण्यात आलेल्या २१० पीक कापणी प्रयोगांपैकी ४ प्रयोगांचे अहवाल प्राप्त झाले असून,

Chana Farm
Chana Harvesting : हरभरा पीक काढणीच्या अवस्थेत

त्या अहवालानुसार जिल्ह्यात हरभऱ्याची हेक्टरी उत्पादकता १२ क्विंटल २ किलो ५० ग्रॅम इतकी आली आहे. बीड जिल्ह्यात हरभऱ्याचे पीक पक्वतेच्या ते काढणीच्या अवस्थेत आहे. जवळपास ९० टक्के काढणी पूर्ण झाली आहे. आजवर प्राप्त पीक कापणी प्रयोगानुसार जालना जिल्ह्यात हरभऱ्याची हेक्‍टरी उत्पादकता १० क्विंटल १५ किलो ८७ ग्रॅम इतकी आली आहे.

जिल्हानिहाय उत्पादकता स्थिती

छत्रपती संभाजीनगर

उत्पादकता ९ क्विंटल ६२ किलो ९०० ग्रॅम

जालना

उत्पादकता १२ क्विंटल २ किलो ५० ग्रॅम

बीड

उत्पादकता १० क्विंटल १५ किलो ८७ ग्रॅम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com