फ्युचर्स किमतीः सप्ताह- ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४
ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात यावर्षी गेल्या वर्षाच्या याच दोन महिन्यांच्या तुलनेने कापसाची आवक २५ टक्क्याने व मक्याची आवक ९३ टक्क्यांनी वाढली आहे. सोयाबीनची आवक मात्र १ टक्क्याने कमी झाली आहे.
सोयाबीनच्या व कापसाच्या जागतिक किमती ऑगस्टपर्यंत घसरत होत्या; त्या अजूनही वाढत नाहीत. भारतातील सोयाबीनच्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत. जागतिक किमती नजीकच्या भविष्यात वाढण्याची शक्यता फार कमी आहे.
भारतातील उत्पादनसुद्धा या वर्षी वाढलेले आहे. सोयाबीनची सरकारी खरेदी जाहीर करण्यात आली ; पण त्याचा किमतींवर काही परिणाम झालेला नाही. या सप्ताहात किमती पुन्हा उतरल्या. मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी पशुखाद्याची मागणी वाढत आहे; त्यामुळे त्याचा किमतींवर परिणाम झालेला नाही.
तुरीची मागणी वाढती आहे. या सप्ताहात तुरीच्या किमतीनी परत उचल घेऊन रु. १०,००० चा पल्ला गाठला. टोमॅटोच्या किमती सुद्धा या सप्ताहात मोठ्या प्रमाणात वाढल्या.
१ डिसेंबर पासून NCDEX मध्ये एप्रिल डिलीवरीसाठी मक्याचे व जून डिलीवरीसाठी हळदीचे व्यवहार सुरू झाले. NCDEX मध्ये यामुळे डिसेंबर महिन्यात कपाशीचे फेब्रुवारी, एप्रिल व नोव्हेंबर डिलीवरीसाठी, मक्याचे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल डिलीवरीसाठी आणि हळदीसाठी डिसेंबर, एप्रिल, मे व जून डिलीवरीसाठी व्यवहार सुरू असतील. MCX मध्ये कापसासाठी जानेवारी, मार्च व मे डिलीवरीसाठी फ्यूचर्स व्यवहार चालू आहेत.
६ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ५४,२२० वर आले होते. या सप्ताहात ते याच पातळीवर आहेत. जानेवारी फ्युचर्स भाव ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ५५,६६० वर आले आहेत. मार्च भाव रु. ५७,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ७.९ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाची आवक वाढती आहे.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात १.७ टक्क्यांनी घसरून रु. १,४१४ वर आले आहेत. फेब्रुवारी फ्युचर्स १.९ टक्क्यांनी घसरून रु. १,४३८ वर आले आहेत तर एप्रिल फ्युचर्स रु. १,५३२ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ८.९ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. ०.५ टक्क्यांनी वाढून रु. २,४५० वर आल्या आहेत. जानेवारी फ्युचर्स किमती रु. २,४७२ वर आल्या आहेत. मार्च फ्युचर्स रु. २,५०० वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव २ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात ०.१ टक्क्यांनी वाढून रु. १३,९३६ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती २.६ टक्क्यांनी घसरून रु. १४,१८८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.८ टक्क्यांनी अधिक आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) या सप्ताहात १.३ टक्क्यांनी वाढून रु. ७,८०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० जाहीर झाला आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ७,८०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ जाहीर झाला आहे. किमती कमी होत आहेत.
सोयाबीन
या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ३.१ टक्क्यांनी घसरून रु. ४,३४३ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) ११.६ टक्क्यांनी वाढून रु. १०,००० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत या सप्ताहात २,५ टक्क्यांनी घसरून रु. ५,५९८ वर आली आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) वाढून रु. ५,५९८ वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.