हरियाणा सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली दिवाळीची भेट उसाला प्रति टन ४,१५० रुपयांपर्यंत वाढ जाहीर उसासाठी जाहीर केलेला हा देशातील उच्चांकी दर असल्याचा दावा .Sugarcane Price: हरियाणा सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. राज्य सरकारने रविवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला उसाला प्रति क्विंटल ४१५ रुपये म्हणजेच प्रति टन ४,१५० रुपयांपर्यंत वाढ जाहीर केली. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिवाळीची भेट असल्याचे म्हटले आहे. ऊस पिकासाठी जाहीर केलेला हा देशातील उच्चांकी ऊस दर असल्याचे राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे..Sugarcane Season : कर्नाटकचा ‘गनिमी कावा’.लवकर तोडणीला येणाऱ्या ऊस वाणांचा दर प्रति टन ४ हजार रुपयांवरुन ४,१५० रुपये करण्यात आला आहे. तर उशिरा तोडणीला येणाऱ्या वाणांचा दर प्रति टन ३,९३० रुपयांवरून ४,०८० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला.."या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे हरियाणा सरकारने देशातील उच्चांकी उसाचा दर जाहीर करुन एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि त्यांची आर्थिक समृद्धीसाठी हा एक मोठा निर्णय आहे. ही ऊस दरवाढ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेट आहे. त्यांची कठोर मेहनत आणि समर्पणाची दखल घेत राज्य सरकार त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे..Sugarcane FRP: उसाला विनाकपात ३७५१ रुपये उचल मिळावी : राजू शेट्टी.हा निर्णय केवळ शेतकरी हितासाठी नाही तर राज्याच्या शेती अर्थव्यवस्थेला नवीन गती देईल, असा विश्वास मुख्यमंत्री सैनी यांनी व्यक्त केला आहे. त्यांचे सरकार शेतकरी कल्याणासाठी वचनबद्ध आहे. उसाला उच्चांकी दर देऊन, सरकारचा शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे..या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेलच. त्याशिवाय हरियाणा सरकारचा हा निर्णय इतर राज्यांसाठी एक आदर्श निर्माण करेल. या निर्णयामुळे त्यांची दिवाळी गोड होईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे..हरियाणात २०२४-२५ च्या गाळप हंगामात, विविध सहकारी साखर कारखान्यांनी १,२७८.५० कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला होता. त्याची सर्व बिले शेतकऱ्यांना देण्यात आली होती, असे राज्य सरकारच्या कृषी खात्याकडून सांगण्यात आले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.