Soybean Procurement: राज्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी हमीभाव खरेदीची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्येच प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र यंदा अद्याप शासन आदेश न आल्याने आणि खरेदी केंद्रांची निवड न ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि अनिश्चितता वाढली आहे.