Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : अनेक बाजारांत कापूस दरात सुधारणा

Cotton Bajarbhav : देशातील बाजारांत कापूस दरात पुन्हा सुधारणा दिसत आहे. मागील आठ दिवसांमध्ये कापसाची सरासरी दरपातळी सुधारलेली दिसते.

Team Agrowon

Pune News : देशातील बाजारांत कापूस दरात पुन्हा सुधारणा दिसत आहे. मागील आठ दिवसांमध्ये कापसाची सरासरी दरपातळी सुधारलेली दिसते. तर आवकही कमी झाली. सोमवारी (ता. ५) काही बाजारांमध्ये कापसाला कमाल ८ हजारांचा दर मिळाला होता. तर कापसाची सरासरी दरपातळी ७ हजार ते ७६०० रुपयांच्या दरम्यान होती.

देशातील बाजारात कापूस दरात मागील आठवड्यापासून सुधारणा दिसत आहे. बाजारातील कापसाची आवक आता कमी झाली. मे महिन्यात कापूस आवक एक लाख गाठींपेक्षा अधिक राहिली. याचा दबाव दरावर आला होता. परिणामी कापसाच्या भावाने हंगामातील नीचांकी दर गाठला.

अनेक बाजारांत कमाल भाव ७ हजारांपेक्षा कमी झाले होते. खरिपातील पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात कापसाची विक्री करत होते. दर कमी झाले तरी कापूस येत असल्याने व्यापारी आणि उद्योगांनी कापसाचे भाव आणखी पाडले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.

आता शेतकऱ्यांची खरिपाची गरज जवळपास भागली. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. आता खूपच कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. कापसाचे भाव मे महिन्यात कमी असताना अनेक शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग केले.

आता कापूस कमी आहे. तसेच भाव वाढल्याशिवाय हे शेतकरी कापूस बाहेर काढण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे भाव वाढत असल्याचे व्यापारी आणि जाणकारांनी सांगितले.

अकोटमध्ये कमाल दर ८१४० रुपये

मे महिन्यात १ लाख २० हजार ते १ लाख ३० हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होती. ती आता ७० ते ७५ हजारांवर आली. कापसाची आवक सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे दरातही सुधारणा पाहायला मिळते. ६ हजारांवर गेलेले कापसाचा किमान भाव आता ७ हजारांवर पोहोचला.

\तर कमाल भावाने काही बाजारांमध्ये ८ हजारांचा टप्पा गाठला. सोमवारी अकोट बाजारात कापसाला कमाल भाव ८१४० रुपये मिळाल्याची माहिती मिळाली. अर्थातच हा भाव सर्वच मालाला मिळाला नाही. लांब धाग्याच्या गुणवत्तापूर्ण कापासाल हा भाव मिळाला.

दर आणखी सुधारण्याचा अंदाज

यापुढील काळात कापसाची आवक आणखी कमी होत जाणार आहे. तसेच आता जास्त दिवस थांबू शकतील अशाच अगदी थोड्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. हे शेतकरी सध्याच्या भावात कापूस विकण्याची शक्यता खूपच कमी आहे.

त्यामुळे दरात आणखी सुधारणा दिसू शकते. तसेच यंदा पावसाचे प्रमाण कसे राहते आणि कापूस लागवड किती होते, यावरच कापसाचे भाव अवलंबून राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT