Cotton Seed : शोधू कुठं र... ; कापसाची दर्जेदार बियाणे बाजारातून अचानक गायब

Team Agrowon

दराची घसरण

यंदा कापसाला दहा हजारांहून अधिक दर मिळतील, अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आशा होती. पण जानेवारी महिन्यापासून कापसाच्या दरात मोठी घसरण झाली.

Cotton Seed | agrowon

आवक वाढली

खरीप हंगामाच्या तोंडावर बाजारात आवक वाढल्याने किमान दर सहा हजार रुपये तर कमाल दर सात हजार रुपयांहून कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापूस विक्री करणे पसंत केले.

पेरणीची तयारी

मान्सूनचा पाऊस काही दिवसांवर आल्याने गावागावात खरीप हंगामातील पेरणीसाठीची शेतकऱ्यांकडून लगबग वाढली आहे

Cotton Seed | agrowon

बियाणे खरेदीसाठी गर्दी

खरीप हंगामात मशागतीची कामे झाली असून शेतकरी बाजारामध्ये कापसाचे बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढत आहे.

Cotton Seed | agrowon

बियाणांचा तुटवडा

पण बाजारामध्ये दर्जेदार बियाणांचा तुटवडा जाणवत असून प्रसिद्ध कंपन्यांचे बियाणेच मिळत नसल्याने अडचण वाढली आहे.

Cotton Seed | agrowon

हलक्या दर्जाचे बियाणे

शेतकऱ्यांनी ४ पाकिटांची मागणी केली असता केवळ २ पाकिट दिले जात आहेत. त्यांच्यासोबत हलक्या दर्जाचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह धरला जात आहे.

Cotton Seed | agrowon

दुप्पट किमंत

यवतमाळमध्ये ८०० रुपये प्रती पॅकेटचे हे वाण १ हजार ३०० ते १ हजार ४०० रुपयांत शेतकऱ्यांना विकले जात असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या लक्षात आणून दिले आहे.

Cotton Seed | agrowon

अतिवृष्टीमुळे बियाणांचे नुकसान

मुळात बियाणे उत्पादनाचे काम दिलेल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत नुकसान झाले. त्यामुळे कंपन्यांकडे बियाणांचा तुटवडा जाणवत आहे.

Cotton Seed | agrowon
monsoon season | agrowon
आणखी पहा