Cotton Cultivation : साडेचार लाख हेक्टरवर कापूस लागवडीचा अंदाज

Cotton Bajarbhav : यंदा जिल्ह्यातील साडेनऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यातील ५० टक्के म्हणजे चार लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
Cotton Cultivation News
Cotton Cultivation NewsAgrowon

Yavatmal Cotton Update : यंदा जिल्ह्यातील साडेनऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यातील ५० टक्के म्हणजे चार लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

यासाठी तब्बल २२ लाख पाकिटांची बुकिंग कृषिसेवा केंद्रचालकांनी केली आहे. एक जूनपासून शेतकऱ्यांना कपाशी बियाण्याची विक्री करण्याचे शासनाचे आदेश होते. त्यानुसार शेतकऱ्यांना कापूस बियाणे विक्रीचा ‘श्रीगणेशा’ झाला आहे.

शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात चांगल्या प्रतीचे बियाणे, खते, कीटकनाशक आतापासून शेतकऱ्यांनी घेऊन ठेवण्यास सुरुवात केली आहे.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. यावर वर्षभराचा डोलारा अवलंबून असतो. शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे बियाणे, खते आदी कृषिनिविष्ठा मिळाव्यात, यासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे.

Cotton Cultivation News
Cotton Market Rate : परभणीत कापसाच्या दरात ५०० ते ७०० रुपयांनी वाढ

जिल्ह्यात यंदा नऊ लाख ५५ हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड होण्याचा अंदाज आहे. त्यात कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग या प्रमुख पिकांसह इतरही पिकांचा समोवश आहे. असे असले तरी तब्बल ५० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड शेतकरी करणार आहेत.

यंदा चार लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे. यासाठी २२ लाख बियाणे पाकिटे शेतकऱ्यांना लागणार आहेत. बियाण्यांची मागणी पाहता प्रशासनाने आधीपासूनच तयारी करून ठेवली आहे. जिल्ह्यात मूबलक प्रमाणात कपाशी बियाणे आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन हंगामात बियाण्याची अडचण येणार नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. जिल्ह्यात यंदा बियाणे व खत मूबलक प्रमाणात आहे.

खतांचे नियोजन यंदा प्रशासनाने चांगले केले आहे. कपाशी बियाण्यासाठी आवश्यक असलेले पाकिटे जिल्ह्यात दाखल झालेली आहेत. त्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना बियाण्यांची अडचण जाणार नाही. काही विशिष्ठ वाणाला शेतकऱ्यांची अधिक पसंती दिसत आहे. त्यामुळे काही भागांत ठरवून दिलेल्या मुल्यांच्या वर बियाणे विक्री केली जात आहेत.

गेल्या दोन तीन वर्षांत कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाले होते. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक जूनपर्यंत शेतकऱ्यांना कपाशी बियाणे विक्री न करण्याचे आदेश शासनाचे होते. परिणामी, बियाणे येऊनही शेतकऱ्यांना विक्री झालेली नाहीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com