Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : कापूस कधीपर्यंत दबावात असेल?

सध्या कापसाचा बाजार दबावात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पण दरवर्षी शेतकऱ्यांच्या हाती कापूस आल्यानंतर बाजारात दर कमी होतात.

अनिल जाधव

पुणेः सध्या कापसाचा बाजार (Cotton Rate) दबावात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पण दरवर्षी शेतकऱ्यांच्या हाती कापूस आल्यानंतर बाजारात दर (Cotton Market Rate) कमी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता बाजार सुधारण्याची वाट पाहिली आणि टप्प्यटप्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असे जाणकारांनी सांगितले.

कापूस उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात आलं की बाजारात दर कमी होतात. हा आजवरचा अनुभव आहे. मागीलवर्ष त्याला अपवाद ठरलं. त्यासाठी त्याची विशेष कारणंही आहेत. मात्र एरव्ही शेतकऱ्यांना आपल्याकडील कापूस दोन-तीन महिन्यांत विकला की त्याचा उद्योगांकडून साठा केला जातो. नंतर तो कापूस बाजारात आणून तेजी-मंदी केली जाते. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.

देशातील बाजारात सध्या कापसाचे दर दबावात आहेत. जिनिंग आणि प्रेसिंग उद्योग सूतगिरण्यांकडून रुईला मागणी नसल्याचे सांगत आहेत. तर सूतगिरण्या कापड उद्योगाकडून सुताला मागणी नसल्याचं सांगतात. तसंच कापड उद्योग कापडाला उठाव नसल्याचं रडगाणं गातोय. मात्र या सगळ्यात भरडला जातोय तो कापूस उत्पादक शेतकरी.

यंदाही सध्या बाजार दबावात आहे. शेतकऱ्यांना अगदी ६ हजार रुपयांपासून दर मिळतोय. तर कमाल दर आता ९ हजार ५०० रुपयांवरून ८ हजार ५०० रुपयांवर आलाय. या दरात शेतकऱ्यांनी कापूस विक्री करू नये, असे आवाहन कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी दोन महिने धीर धरल्यास कापूस दरात वाढ होऊ शकते, असा अंदाजही वैराळे यांनी व्यक्त केला आहे.

सध्या देशातील कापूस दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा काहीसे जास्त दिसत असले तरी देशातील कापूस वापरही जास्त आहे. त्यामुळे कापूस सतत दबावात राहू शकत नाही. सध्या दबाव निर्माण होऊन जास्तीत जास्त कापूस कमी दरात बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असंही काही जाणकारांनी सांगितले.

त्यातच शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी आणि दिवाळीसाठी पैशांची गरज होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दरात कापूस विकला. मात्र आता शेतकरी कमी दरात कापूस विक्री कमी करतील, अशाही अंदाज व्यक्त केला जातोय. शेतकऱ्यांनी जानेवारी-फेब्रुवारीत कापूस विक्री केल्यास ९ हजार रुपयांपर्यंतही दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन कापसाची विक्री करावी आणि पॅनिक सेलिंग टाळावे, असे आवाहनही जाणकारांनी केले.

शेतकऱ्यांच्या हाती कापूस आणि त्यातच दिवाळी सण तसेच पेरणीमुळे गरज निर्माण झाली. त्यामुळे कापूस दर दबावात आहेत. पुढील दोन महिने कापूस बाजारात ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र शेतकऱ्यांनी जानेवारीपर्यंत थांबल्यास ९ हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो.
गोविंद वैराळे, कापूस बाजार अभ्यासक आणि जाणकार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT