Cotton Market : कापूस बाजार अद्यापही दबावात का?

दिवाळीनंतर कापूस दरात सुधारणा होण्याची आशा होती. मात्र कापसाच्या बाजारात अजून नरमाईच दिसत आहे.
कापूस बाजार
कापूस बाजारAgrowon
Published on
Updated on

दिवाळीनंतर कापूस दरात (Cotton Rate) सुधारणा होण्याची आशा होती. मात्र कापसाच्या बाजारात (Cotton Market) अजून नरमाईच दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावात असल्याचा परिणाम देशातील दरावर होत आहे. त्यामुळे देशातील कापूस दर काहीसे नरमले. सध्या कापसाला काय दर मिळतोय? कापसाचे दर कधी सुधारतील? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

कापूस बाजार
Cotton Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावात

सोयाबीनचे दर स्थिर

देशातील बाजारात सोयाबीनचे दर एका भावपातळीभोवती स्थिर आहेत. पावसाने गुणवत्ता कमी झालेल्या सोयाबीनची विक्री शेतकरी करत आहेत. त्यामुळे मिल्सना आवश्यक सोयाबीन उपलब्ध होतेय. त्यामुळे सोयाबीनचे दर स्थिर आहेत. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ७०० ते ५ हजार २०० रुपये क्विंटल दर मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे दर १३ ते १४ डाॅलर प्रतिबुशेल्सदरम्यान फिरत आहेत. देशातील बाजारात सोयाबीनला पुढील काही दिवस ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. 

कापूस बाजार
Cotton MSP : कापसाला १२ हजार हमीभाव द्या

कोबीचे दर टिकून

 सध्या कोबीचे दर टिकून आहेत. ऑक्टोबर महिन्यात जवळपास तीन आठवडे राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी सध्या बाजारातील आवक कमी असल्याने कोबीचे दर तेजीत आहेत. मोठ्या बाजार समित्या वगळता कोबीची आवक सरासरी २५ क्विंटलपेक्षा कमीच आहे. तर दर २ हजार ते ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. कोबीचे दर पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे.

कोथिंबिरीचे दर वाढले

 बाजारातील कोंथिबीर आवक सध्या कमी आहे. त्यामुळे दर तेजीत आहेत. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये कोथिंबीर पिकाचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आवक कमी झाली. परिणामी कोथिंबिरीला सरासरी ४ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. तर प्रतिजुडीचा दर २० ते २५ रुपयांवर पोचला. कोथिंबिरीचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

गवारचे दर तेजीत

गवारचे दर सध्या तेजीत आहेत. राज्यातील विवध बाजारांमधील आवक नगण्य अशी आहे. राज्यात नागपूर, पुणे आणि मुंबई या बाजार समित्यांमध्ये तुलनेने गवारची आवक जास्त आहे. इतर बाजार समित्यांमधील गवारची आवक सरासरी १० क्विंटलपेक्षाही कमी आहे. त्यामुळे दरात वाढ झाली. सध्या राज्यात गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ७ हजार रुपये दर मिळतोय. गवारचे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

5. दिवाळीनंतर कापसाला उठाव मिळेल, दरात सुधारणा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र सध्या कापसाचे बाजारभाव दबावात आहेत. सध्या कापसाला प्रति क्विंटल किमान ७ हजार ते कमाल ९ हजार रुपयांपर्यंत दर मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर काहीसे कमी झाले आहेत. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे डिसेंबरचे वायदे ७२.११ सेंट प्रतिपाऊंडपर्यंत घसरले. देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरही कापसाचे वायदे जवळपास दोन ते अडीच टक्क्यांनी कमी झाले होते. नोव्हेंबरचे वायदे २९ हजार ७५० रुपये प्रतिगाठ या दराने पार पडले. नोव्हेंबरच्या वायद्यांमध्ये दर ७३० रुपयांनी कमी झाले. तर डिसेंबरचे वायदे ६४० रुपयांनी कमी होऊन २८ हजार २७० रुपयांनी झाले. वायद्यांमध्ये कापसाचे दर दबावात असल्याने बाजार समित्यांमध्येही दर कमी झाले आहेत. ऑक्टोबरमध्ये वेचणीला आलेल्या कापसाचं पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या कापसाची गुणवत्ता कमी झाली. त्यामुळे अशा कापसाला सरासरी ७ हजार रुपये दर मिळत असल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. तर चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला ८ हजार ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. डिसेंबरनंतर जागतिक बाजारात कापसाला उठाव मिळण्याचा अंदाज आहे. त्यावेळी कापसाचे दरही सुधारतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com