Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Market : पाडव्याच्या मुहूर्तावर ७६ हजार पेट्या वाशीत

Mango Season : गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर यंदा वाशी येथील बाजार समितीमध्ये हापूसची आवक गतवर्षीच्या तुलनेत कमीच राहिली आहे. यंदा दोन दिवसांत ७६ हजार पेट्या रत्नागिरी व सिंधुदुर्गमधून दाखल झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर यंदा वाशी येथील बाजार समितीमध्ये हापूसची आवक गतवर्षीच्या तुलनेत कमीच राहिली आहे. यंदा दोन दिवसांत ७६ हजार पेट्या रत्नागिरी व सिंधुदुर्गमधून दाखल झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

गतवर्षी याच कालावधीत एक लाखाहून अधिक पेट्यांची आवक होती. त्यामुळे यंदा पेटीचा दर २ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत राहिला आहे. अनेक ग्राहकांनी पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी आंबे खरेदी केली.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून गुढीपाडवा सण ओळखला जातो. कोकणातील बागायतदार व्यावसायीक आंबा लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी नियोजन करत आले आहेत. मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे बागायतदारांच्या इच्छांवर पाणी पडले आहे. पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे यावर्षी मोहोर येण्यास विलंब झाला. त्याचा परिणाम पुढे उत्पादनावर झाला. पहिली पेटी फेब्रुवारीच्या पहिल्या महिन्यात बाजार गेली असली तरीही या महिन्यातील आवक अत्यल्प होती.

गेल्या वर्षी हापूसचा हंगाम चार महिने म्हणजेच सुमारे १२० दिवस चालला. यंदा मार्च महिन्यात आवक सुरू झाली. सध्याची परिस्थिती पाहता यंदा १० मेपर्यंतच हंगाम राहणार असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. त्यामुळे ६० ते ७० दिवसच बाजारात हापूसची आवक राहील. मागील आठवड्यात कोकणात पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात उष्मा वाढल्याने आंबा काढणी योग्य होण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू झाली होती. शनिवारी (ता. २९) ३६ हजार पेटी कोकणातून वाशी बाजारात पाठविण्यात आल्या, तर रविवारी (ता. ३०) प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिवशी ४० हजार पेट्यांची आवक झाली. दोन दिवसांत मिळून सुमारे ७६ हजार पेट्यांची आवक झाली आहे. तुलनेत गतवर्षी याच काळाच एकाच दिवशी ५५ हजार पेटी आंबा दाखल झालेला होता. त्यामुळे दोन दिवसांत लाखांच्या दरम्यान पेट्यांची आवक होती.

हापूसचे उत्पादन कमी राहिल्याने यावर्षी पाच ते आठ डझनच्या पेटीचे दर २ हजार ते ५ हजार रुपये इतके आहेत. गतवर्षी हाच दर १५०० ते ४ हजार रुपये होते. ५०० ते २ हजार रुपयांचा फरक यंदा दिसत आहे. दर्जेदार आंब्याचा दर पेटीला ५ हजार मिळत असल्याने काही बागायतदारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

परंतु दुबईमध्ये ईद साजरी करण्याचा उत्साह असल्याने मार्केट शांत आहे. त्याचा परिणाम आंब निर्यातीवर होत असल्याची चिंता वाशीतील व्यावसायिक अशोक हांडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच स्थानिक पातळीवरही ग्राहक कमी असल्याने आंबा खरेदी कमी होऊ लागली आहे. आंबा पडून राहत असल्याचेही हांडा यांनी सांगितले.

अमेरिकेतील निर्यांत आजपासून सुरू

दुबई, लंडनसह अमेरिकेमध्ये हापूसची निर्यात आजपासून सुरू झालेली आहे. निर्यात सुरू झाली तर वाशी बाजारात हापूसच्या पेट्या पडून राहणार नाहीत. तसेच दरही स्थिर राहतील. यंदा कमी उत्पादन असल्याने सर्वच देशांमधील निर्यात एकाचवेळी सुरू झाली तर त्याचा फायदा व्यावसायिकांना होणार आहे. विमानमार्गे हापूस ठिकठिकाणी पाठविला जात आहे.

वाशी बाजार समितीमध्ये हापूसची आवक गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. यंदाचा हंगामही कमी दिवसांचा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही स्थिर राहतील.
- संजय पानसरे, वाशी, बाजारपेठ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT