
Kolhapur Vegetable Market : गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सर्वाधिक आंब्याची आवक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होत आहे. आवक वाढली असली तरी यंदा आंबा उत्पादन कमी असल्याने दरात चांगलीच तेजी दिसत आहे. चांगल्या प्रतिच्या १ डझनच्या आंब्याला १ हजारपासून ते २ हजारांपर्यंत भाव मिळत आहे. तर काही ठिकाणी कर्नाटकातील आलेल्या आंबा विक्री स्टॉलवर दर कमी आहेत.
तसेच, द्राक्षाचा हंगाम आटोपता असून कलिंगड, टरबूजाची आवक वाढली आहे. फूल बाजार मागणीच्या प्रतीक्षेत आहे. गुढीपाडव्यानंतर फुलांना मागणी वाढून बाजार तेजीत येण्याची शक्यता आहे. तर कच्च्या फणसाची आवक सुरू झाली आहे. अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.
कडक उन्हामुळे बाजार समितीत १५ ते २० टक्क्यांनी भाजीपाल्याची आवक घटली असून, यामध्ये सर्वाधिक टक्का पालेभाज्यांचा आहे. त्यामुळे कोथिंबीर, मेथीसह भाज्यांना चांगला दर मिळू लागला आहे. याचबरोबर बाजारात यंदा देवगड हापूस आंबा युनिक कोडनुसार उपलब्ध होणार असल्याने नैसर्गिक आंबा घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. व्यापाऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे विक्रीस आणले आहेत. नियमित आंब्यापेक्षा या आंब्याचे भाव काही प्रमाणात अधिक आहेत; मात्र मागणी यावर्षी चांगली आहे.
भाजीपाला दर प्रतिकिलो : टोमॅटो- १० ते १५, दोडका- ५० ते ६०, वांगी - ३० ते ४०, कारली- ३० ते ४०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची - ६० ते ७०, फ्लॉवर - १० ते १५, कोबी- १५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा - २० ते २५, लसूण- १०० ते १२०, आले - ४० ते ५०, लिंबू - ३५० ते ७०० शेकडा, गाजर -४० ते ५०, गवार - ८० ते १००, भेंडी- ५० ते ६०, ओला वाटाणा - ६० ते ८०, देशी काकडी- ४० ते ५०, काटा काकडी - २० ते ३०, दुधी - २० ते ३०, भाज्या - १० ते १५ रुपये, मेथी, कोथिंबीर - १५ ते २० रुपये पेंढी, शेवगा - २ ते ३ रुपये नग.
फुलांचे दर प्रतिकिलोस : झेंडू - ८० ते १००, निशिगंध - ३०० ते ३५०, गुलाब - २५०, गलांडा - ८० ते १००, शेवंती - १५० ते २००.
फळे (प्रतिकिलो) : सफरचंद - २०० ते २५०, संत्री - ७० ते ८०, मोसंबी- ८० ते १००, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ६० ते १००, मोर आवळा -१२० ते २००, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ८० ते १०० डझन, किवी - १०० ते १२०, ड्रॅगन- १५० ते २००, स्ट्रॉबेरी - ६० ते ८० नग, चिंच- १०० ते १४०, अननस - १०० ते १२०.
खाद्यतेल लिटरमधील दर : सरकी -१३८ ते १४२, शेंगतेल - १९२ ते १९८, सोयाबीन - १३८ ते १४५, पामतेल - १५० ते १५५, सूर्यफूल - १५० ते १५५.
कडधान्य प्रतिकिलो दर : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५०, गहू - ३७ ते ४४, हरभराडाळ - ७५ ते ७८, तूरडाळ- ११० ते १२०, मूगडाळ -१०० ते ११०, मसूरडाळ - ७७ ते ७८, उडीदडाळ - १२० ते १२५, हरभरा- ७० ते ७८, मूग- ९२ ते १००, मटकी- ९५ ते १००, मसूर- ७० ते ७२, फुटाणाडाळ - १०५ ते ११०, चवळी- ९० ते १२५, हिरवा वाटाणा- १७५, छोला -१२० ते १५०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.