Garlic Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Garlic Market Crash: लसणाचा भाव एकाच महिन्यात कोसळला; दर आणखी कमी होण्याचा अंदाज

Agriculture Market Update: लसणाच्या दरात गेल्या महिन्यात मोठी घसरण झाली आहे. डिसेंबरमध्ये २०-२२ हजारांना विकला जाणारा लसूण आता फक्त ८-१० हजारांवर आला आहे. पुढील काळात दर आणखी घसरण्याची शक्यता आहे, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Anil Jadhao 

Pune News: शेतकऱ्यांना चांगला आधार देणाऱ्या लसणाचे भाव एका महिन्यातच कोसळले आहेत. डिसेंबर महिन्यात सरासरी २० ते २२ हजाराने विकला जाणारा लसूण आता देशभरातील बाजारात सरासरी ८ ते १० हजार रुपयाने विकला जात आहे. महत्वाच्या लसूण उत्पादक मध्य प्रदेशात सरासरी ४ हजार ते ६ हजारांचा भाव मिळत आहे. आवक वाढल्यानंतर दरात आणखी घसरण होऊ शकते, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. 

लसणाचा बाजारात मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांना चांगला आधार देणारा ठरत आहे. मागच्या वर्षी बाजारात मिळालेला कमी भाव आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी केलेली लागवड यामुळे देशातील उत्पादन कमी राहीले. मात्र लसणाला उठाव चांगला होता. त्यामुळे गेले वर्षभर लसणाला चांगला भाव मिळाला.

लसणाचे भाव उच्चांकी २८ हजारांवरही पोचले होते. तर सरासरी बाजार २० हजार ते २२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होता. मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा कमी प्रमाणातच मिळाला. वाढलेल्या दराचा फायदा जास्त व्यापारी आणि स्टाॅकीस्ट यांना जास्त मिळाला. 

लसणाचे भाव वाढलेले असल्याने देशभरात लसणाची लागवड वाढली. देशात मध्य प्रदेश लसूण उत्पादनात आघाडीवर आहे. मध्य प्रदेशातही लागवड वाढली. शिवाय देशातील इतर राज्यांमध्येही लागवड चांगली झाली. आता नवा लसूण बाजारात येत आहे. मात्र अजूनही लसूण आवकेचा दबाव वाढलेला नाही. तरीही लागवड वाढली आणि उत्पादन वाढीचा अंदाज असल्याने लसणाचे भाव कमी झाले. सध्या देशात सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ते १० हजारांचा भाव मिळत आहे. म्हणजेच आतापर्यंत भाव निम्म्यापेक्षाही कमी झाले आहेत. 

दर आणखी पडणार ?

देशातील बाजारात लसणाचे भाव सध्या कमी झाले तरी दरातील पडझड येथेच थांबणार नाही. बाजारात लसणाची आवक पुढील काळात आणखी वाढण्याचा अंदाज आहे. आवक वाढल्यानंतर दर आणखी कमी होतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रात सध्या लसूण ८ हजार ते १० हजाराने विकला जात आहे. मध्य प्रदेशात भाव ४ हजार ६ हजार रपुये क्विंटल आहे. तर दक्षिण भारतात लसणाला १२ हजार ते १४ हजारांचा सरासरी भाव मिळत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT