Garlic Market : नगर बाजारात लसूण ३५ हजार रुपये क्विंटल

Garlic Rate : मंगळवारी (ता. २४) लसणाला सुमारे ३५ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला आहे. बाजार समितीत आतापर्यंत मिळालेला हा सर्वाधिक दर आहे.
Garlic Market
Garlic MarketAgrowon
Published on
Updated on

Nagar News : राज्यातील बहुतांश बाजार समित्यांत गेल्या वर्षभरापासून लसणाचा दर टिकून आहे. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला २० ते ५० क्विंटलदरम्यान आवक होत आहे. मंगळवारी (ता. २४) लसणाला सुमारे ३५ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला आहे. बाजार समितीत आतापर्यंत मिळालेला हा सर्वाधिक दर आहे.

घोडेगाव व अन्य बाजारात बियाण्यांसाठी खरेदी होणाऱ्या लसणाला ४५० रुपये किलोपर्यंत दर मिळाला आहे, असे सांगण्यात आले. राज्यात कांद्याचे उत्पादन घेतल्या जाणाऱ्या नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सांगली, सातारा, पुणे येथील काही भागांत लसणाचे उत्पादन घेतले जाते.

Garlic Market
Garlic Rate : श्रावण असूनही लसूण खातोय भाव

कांद्याच्या लागवडीबाबत हंगामाच्या सरतेशेवटी आकडेवारी कृषी विभाग जाहीर करते. मात्र राज्यात लसणाचे क्षेत्र किती आहे, याची नेमकी आकडेवारी कृषी विभागाकडे उपलब्धच नाही. मात्र जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लसणाच्या उत्पादनालाही शेतकरी प्राधान्य देत असून दोन ते चार लाख हेक्टरपर्यंत लसणाची राज्यात लागवड होत असल्याचा अंदाज आहे. नगर जिल्ह्यातील काही गावांत तर केवळ लसणाचेच उत्पादन घेतले जाते.

लसणाला साधारणपणे ५० ते १०० रुपये क्विटंलपर्यंत दर मिळतो. यंदा मात्र वर्षभरापासून लसणाचे दर टिकून आहे. वर्षभरात मिळालेल्या दराचा विचार केला तर दीडशे रुपये प्रति किलोच्या पुढेच ठोक खरेदी-विक्रीत दर राहिलेले आहेत. मंगळवारी (ता. २४) नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाला प्रति क्विटंल १० हजार ते ३५ हजार व सरासरी २२ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. लसणाला मिळालेला हा आतापर्यंत वर्षभरातील सर्वाधिक व उच्चांकी दर आहे.

Garlic Market
Chinese Garlic : बाजारात भाव खातोय चिनी लसूण

नगर येथील बाजार समितीत नगरसह, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, नगर व नाशिकच्या काही भागांतून लसूण विक्रीला येत आहे. अलीकडच्या महिनाभरात लसणाची आवक काहीशी कमी झालेली आहे. मात्र पहिल्यांदाच लसणाचे जास्तीचे दर टिकून राहिलेले आहेत. लसणाची साधारण १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर काळात लागवडी होत असतात. यंदा मात्र आताच लागवडी सुरू झाल्या आहेत.

उत्पादन घटल्याचा परिणाम

महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, तमीळनाडू, गुजरातेसह देशातील साधारण १४ राज्यांत लसणाचे उत्पादन घेतले जाते. तीन वर्षांपूर्वी अधिक उत्पादन झाल्याने गुजरात व अन्य राज्यातून महाराष्ट्रात येऊन अल्प दरात (२० ते २५ रुपये किलो) लसणाची विक्री झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही दर पडले. त्यामुळे शेतकरी लसणापासून दूर गेले. गेल्यावर्षी लागवड कमी झाल्याने यंदा लसणाला उच्चांकी दर मिळत आहे. यंदा मात्र लागवडी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दोन वर्षांपासून लसणाचे क्षेत्र कमी झाल्याने यंदा सर्वाधिक दर मिळत आहे. मी बियाण्यांसाठी लसणाची ५०० रुपये प्रति किलोने विक्री केली. यंदा बियाणाला मागणी आहे, मात्र पाहिजे तेवढे बियाणे उपलब्ध नाही. लसणाला उच्चांकी दर मिळत असला तरी सर्वसाधारण दरही कायम परवडणारा आहे. लसणाचे उत्पादन नेहमी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहिले आहे.
कृषिभूषण विष्णू जरे, शेतकरी व लसणाचे अभ्यासक, बहिरवाडी, ता. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com