Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Urea Stock : खरीप हंगामासाठी युरियाचा साठा संरक्षित ठेवण्यासाठी दी. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, नागपूर आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Urea Shortage
Urea ShortageAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि आदेशानुसार खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी युरिया व डीएपी या रासायनिक खताचा संरक्षित साठा खुला करण्यात आला आहे.

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा व धारणी या भागातील युरिया आणि डीएपी खताच्या मागणीसंदर्भात नुकतीच बैठक घेतली होती. त्यांच्या पुढाकाराने युरिया व डीएपीचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Urea Shortage
Fertilizer Buffer Stock : ‘बफर स्टॉक’मधून १३०२ टन युरिया खुला

खरीप हंगामासाठी युरियाचा साठा संरक्षित ठेवण्यासाठी दी. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, नागपूर आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये १८६०.६०५ मेट्रिक टन युरिया व ८०८.४५ मेट्रिक टन डीएपीचा साठा या संस्थांमार्फत संरक्षित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नऊ जुलै रोजी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा मुक्त करण्यास मान्यता दिली आहे. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील तालुकानिहाय युरियाचा साठा वितरित करण्यात येणार आहे.

Urea Shortage
Fertilizer : शेतकरी वापरत असलेल्या खते, खर्चावर संशोधन व्हावे

तालुकानिहाय मंजूर साठा

अचलपूर : ७० मेट्रिक टन , दर्यापूर : १२० मेट्रिक टन, चांदूरबाजार : ५० मेट्रिक टन, अमरावती ः ४० मेट्रिक टन, चिखलदरा : १०० मेट्रिक टन, भातकुली : ४० मेट्रिक टन, नांदगाव खंडेश्वर ४० मेट्रिक टन, अंजनगावसुर्जी : १०० मेट्रिक टन, धारणी : १४० मेट्रिक टन, तिवसा : ४० मेट्रिक टन, चांदूररेल्वे : ३० मेट्रिक टन, मोर्शी : ८० मेट्रिक टन व वरुड : ८० मेट्रिक टन. जिल्ह्यात एकूण ९३० मेट्रिक टन युरियाचा साठा आता विक्रीसाठी उपलब्ध होईल.

मुक्त करण्यात आलेला हा रासायनिक खतांचा साठा तातडीने शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, असे निर्देश कृषी विकास अधिकारी एम. जे. ताडकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com