Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Irrigation Subsidy : अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सिंचन विहिरीसह अन्य योजनांच्या अनुदानात वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी योजनेवर परिणाम होत होता.
Agriculture Well
Well IrrigationAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सिंचन विहिरीसह अन्य योजनांच्या अनुदानात वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी योजनेवर परिणाम होत होता. मात्र सहा महिन्यांपासून अनुदानात वाढ झाल्याने अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांचा योजनेचा लाभ घेण्याकडे कल वाढला असल्याचे दिसून येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषिक्रांती योजनेतून विहिरीसाठी अनुदान मिळाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात तीन वर्षांत पाचशे शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ मिळाला. अन्य योजनांचाही १०६१ लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून यंदा त्यात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.

Agriculture Well
Irrigation Subsidy : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचे अनुदान मिळेना

सर्वसाधारण शेतकऱ्यांना सिंचन विहीर करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) मधून सिंचन विहिरीचे काम करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदान दिले जाते. याशिवाय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून तर आदिवासी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अनुदान दिले जाते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) मधून विहिरीसाठी चार लाखाचे अनुदान असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत दिल्या जाणाऱ्या विहिरीसाठीचे अनुदान अडीच लाख होते. काम एकच असताना दोन योजनांतील अनुदानाच्या फरकाने शेतकऱ्यांनी काहीसी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत होते.

दहा महिन्यापूर्वी शासनाने विहिरीच्या अनुदानात वाढ करून चार लाखाचे अनुदान केले. काही जाचक अटी रद्द केल्या, शिवाय अन्य योजनांचे अनुदानही वाढवले. त्याचा आता चांगला परिणाम दिसू लागला आहे.

Agriculture Well
Irrigation Subsidy : ठिबक अनुदानाबाबत संभ्रम

दोन्ही योजनांतून गेल्या तीन वर्षात पाचशे शेतकऱ्यांनी विहिरीचा तर नवीन विहीरी, जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच, सोलरपंप, पाईपलाईनचा मिळून १०६१ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. तीन वर्षांत जवळपास २२ कोटी खर्च झाला. यंदा मागणी अर्जात वाढ झाली आहे असल्याचे जिल्हा परिषद कृषी विभागातून सांगण्यात आले.

डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे तीन वर्षांची स्थिती (कंसात बिरसामुंडा योजना)

नवीन विहीरी ः ३६७ (१३३) जुनी विहीर दुरुस्ती ः ३४१ (२९)

पंपसंच ः ३४४ (९८) सोलरपंप ः ६१ (८) पाइपलाइन ः ० (१८१)

तीन वर्षांत तीनशे हेक्टर शेती ओलिताखाली

विहिरीमुळे तीनशे हेक्टर ओलीताखाली अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषिक्रांती योजनेतून सिंचन विहिरीचा तसेच अन्य योजनांत लाभ शेतकऱ्यांनी घेतला.

याचा फायदा म्हणजे तीन वर्षांतील केवळ विहिरीमुळे जिल्हाभरातील सुमारे तीनशे हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे. याशिवाय पाइपलाइन, सोलरपंप, जुन्या विहिरीची दुरुस्ती, पाइपलाइन यासारखी कामेही करता आल्याचा आदिवासी तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा झाला. अनेक जिरायती शेतकरी बागायतदार झाल्याचे झाल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com