Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : कापूस, सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहेत गहू दर?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, गवार आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी कापसाच्या वायद्यात नरमाई दिसून आली. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी ७२.७२ सेंटवर होते. देशातील वायदेही ५८ हजार ७५८ रुपयांवर आहेत. बाजार समित्यांमध्ये भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी झाली.कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्येही शुक्रवारी नरमाई आली होती. याचा दबाव देशातील बाजारावरही कायम आहे. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.३५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३४१ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

कांद्याच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये काही बाजारांमध्ये काही प्रमाणात चढ उतार पाहायला मिळाले. पण बाजारातील कांद्याची आवक कमीच आहे. त्यामुळे सध्या कांद्याचा सरासरी भाव २४०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. यंदा देशातील कांदा उत्पादन घटले. त्यामुळे चांळीत कांदा कमी आहे. त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

गव्हाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. सरकारने गव्हावर स्टाॅक लिमिट लावल्याचा परिणाम दरावर काही प्रमाणात दिसून आला. बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव मात्र सरकारला अपेक्षित पातळीवर कमी झाले नाहीत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बाजारात गवारची आवक कमीच असून दुसरीकडे गवारचा उठाव चांगला आहे. त्यामुळे गवारचे भाव तेजीत आहेत. गवारच्या उन्हाळी लागडीसाठी अनेक भागात पाण्याची टंचाई होती. आजही पिकाला बहुतांशी ठिकाणी पाणी कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्याचा परिणाम गवारच्या बाजारातील आवकेवर होत आहे. त्यामुळे गवारचा भाव ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. गवारचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT