Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Soybean Rate : बारदान्याचा तुटवडा असल्याने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर प्रत्यक्षात सोयाबीनच्या खरेदीला उशिराने सुरवात झाली.

Team Agrowon

Dharashiv News : बारदान्याचा तुटवडा असल्याने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर प्रत्यक्षात सोयाबीनच्या खरेदीला उशिराने सुरवात झाली. त्यानंतर सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याचा परिणाम सोयाबीनच्या खरेदीवर झाला. यातच हमीभावाने खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीची मुदत संपून गेली.

ही परिस्थिती लक्षात घेता सरकारने सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ दिली असून शेतकऱ्यांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.

यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन विकण्याची घाई न करता ३० नोव्हेंबरपर्यंत खरेदी केंद्राकडे नोंदणी करावी. सोयाबीन खरेदीनंतर अवघ्या चार दिवसांत प्रतिक्विंटल चार हजार ८९२ रुपयांप्रमाणे रक्कम खात्यात जमा केले जात आहे. शनिवारपर्यंत ६० लाखाहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गही करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात १७ हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे.

सुरवातीच्या काळात बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदीला उशीर झाला. फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया तातडीने राबवून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला आहे. हमीभाव केंद्रांवर खरेदी प्रक्रियेला आता गती आल्यामुळे खुल्या बाजारात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी दहा दिवसांच्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा. बारदाना मोठ्या प्रमाणात आल्यानंतर सोयाबीन खरेदी खरेदीला गती मिळत आहे.

जिल्ह्यातील केंद्रांसाठी आतापर्यंत १२ हजार शंभर शेतकऱ्यांनी फेडरेशनकडे नोंदणी केली असून ३२० शेतकऱ्यांच्या सात हजार ३०० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. त्यापैकी ६० शेतकऱ्यांच्या खात्यावर बाराशे क्विंटल सोयाबीन खरेदीपोटी साठ लाखाहून अधिक रक्कम जमा झाले आहे.

यापूर्वी सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

ITI Modernization : राज्यातील शंभर ‘आयटीआय’चे बळकटीकरण करणार

Hybrid Calves Crisis : संकरित गाईंची नर वासरे झाली नकोशी

Dam Water Discharge : पावसाचा जोर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील 19 धरणांतून विसर्ग

Humani Attack : विदर्भात हजारो हेक्‍टर पिकांवर हुमणीचा प्रादुर्भाव

Fertilizer Rate : पोटॅशसह इतर खतांच्या दरात झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT