Pune News : राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस कोसळत असून, तो रब्बीच्या पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे. खरिपाच्या उर्वरित पिकांची काढणी आणि रब्बीच्या पेरणीचे नियोजन या पावसामुळे वेळेवर होऊ शकणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत नुकसानकारक पावसाची, तसेच थंडीला मारक ठरणाऱ्या प्रणालींची शक्यता कमी असल्याने या काळात कडाका वाढत जाणार आहे, असे मत भारतीय हवामान विभागाचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले..नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशभरातून परतल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा, तसेच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वाऱ्यांचा (ईशान्य मॉन्सन) हंगाम असतो आहे. या काळात महाराष्ट्रात पाऊस होत असतो, मात्र त्याची सरासरी कमी असते. यातही ऑक्टोबर महिन्यात अधिक पाऊस पडतो, तर उर्वरित दोन महिन्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. या राज्याच्या उत्तरेकडील भागात खानदेश, विदर्भ, उत्तर मराठवाड्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी असते. मात्र दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांतच या तीन महिन्यांत पावसाचे प्रमाण अधिक असते..Rabi Season: जमिनी वाफशाला; रब्बीची तयारी सुरू.ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या काळात नाताळापर्यंत महाराष्ट्रात होणारा पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यातच जास्त होतो. बंगालच्या उपसागरामार्गे दक्षिण भारतात येणारी पूर्वीय प्रणाली हेच याचे मुख्य कारण आहे. या कमी दाब प्रणालींमुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यांना सर्वाधिक पाऊस पडतो. त्याचा काही अवशेष हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे असलेल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस देऊन जातो. मात्र उत्तरेकडील जिल्ह्यात हा पाऊस नसतो किंवा क्वचितच झाल्याचे दिसून येते..सध्या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात असून, राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात हा पाऊस कमी-अधिक प्रमाणात सुरूच राहणार आहे. राज्यात मुख्यतः ढगाळ हवामान राहणार असून, काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाची भीती बाळगायचे कारण नाही, कारण हे नियमितपणे घडते. हा पाऊस पुढील रब्बी हंगामासाठी लाभदायकच ठरणार आहे. शिवाय नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीला सुरुवात होणार नाही. थंडी वाढण्यास सुरुवात झाली तरी ती नाशिकसह खानदेश, विदर्भाच्या उत्तर भागात असेल. दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र फारशी थंडी जाणवणार नसल्याचे श्री. खुळे यांनी नमूद केले..Rabi Sowing: खानदेशात रब्बी पेरणी १५ टक्के पूर्ण; शेतकऱ्यांचा हरभऱ्याकडे कल.ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात अतिवृष्टीच्या घटना या खूप कमी असतात. मात्र कमी दाबाची प्रणाली तमिळनाडू मार्गे पश्चिमेकडे न जाता काही प्रमाणात उत्तर आणि वायव्य दिशेकडे सरकून महाराष्ट्राकडे येते. तेव्हा राज्यात पावसाचे प्रमाण वाढते आणि अतिवृष्टी-पुरासारख्या हवामान घटना घटतात. मात्र यंदाच्या हंगामात ही स्थिती नाही. कारण या वेळी हिंद महासागरातील द्वि-ध्रुवीयता (इंडियन ओशन डायपोल - आयओडी) नकारात्मक आहे. तसेच व्यापारी वाऱ्यांसह जगभरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि हवामान पद्धतींवर परिणाम करणारे प्रशांत महारागरातील एल निनो- दक्षिणी दोलन (एल निनो सदर्न ऑसिलेशन -एन्सो) तटस्थ आहे. पुढील काळात ला-निना स्थिती म्हणजेच प्रशांत महासागराच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक, तर पश्चिम भागात कमी दाबाची स्थिती असणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये सक्रिय असलेल्या मेडिअन ज्युलियन ऑसिलेशनमुळे (एमजीओ) पुढील काही दिवस पाऊस पडणार आहे..नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात थंडी वाढणारनोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत राज्यात घातक पावसाची आणि येणाऱ्या थंडीला देखील घातक ठरणाऱ्या प्रणालींची शक्यता कमी आहे. त्यामुळे या दोन महिन्यांत थंडी वाढत जाणार आहे. राज्यातील पावसाचे वातावरण निवळताच नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात राज्यात गारठा वाढायला सुरुवात होईल. जानेवारी महिन्यापर्यंत थंडीचा कडाका वाढेल. यातच भूमध्य समुद्रातून हिमालय पर्वत आणि उत्तर भारताकडे येणारे पश्चिमी चक्रावात (वेस्टर्न डिस्टर्बन्स) देखील बळकट होणार आहेत. त्यामुळे हिमालयासह लगतच्या उत्तर भारतात पाऊस, हिमवर्षाव, धुके, गारठा वाढणार आहे. हे वारे महाराष्ट्राकडे येणार असल्याने यंदा थंडीचा हंगाम देखील चांगला असेल. राज्यात होणाऱ्या गारपिटीबाबत आताच बोलणे घाईचे ठरेल, असेही श्री. खुळे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.