Nashik News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बहुतांश बाजार समितीमध्ये दिवाळीच्या तीन-चार दिवस अगोदरच मजूर टंचाई असा विविध कारणांमुळे कांद्याची लिलाव ठप्प झाले होते. आता दिवाळीनंतर पुन्हा कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत. पिंपळगाव बसवंत व लासलगाव या दोन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पार पडले. येथे कांद्याला सरासरी ११०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाले..जिल्हा जवळपास सप्ताहभर कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते. मात्र दिवाळीच्या सणानंतर शुक्रवारी (ता.२४) रोजी पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा आवकेने आवार गजबजला. येथे ३१९९ क्विंटल आवक झाली. त्यास किमान ५००, कमाल १७५८ तर सरासरी १२०० रुपये दर मिळाले. बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते लिलावाला सुरुवात करण्यात आली. लिलाव सुरू होण्यापूर्वी बाजार समितीचे सभागृहात संचालक मंडळ व कांदा व्यापाऱ्यांची बैठक पार पडली..Onion Rate : बाजारभावाअभावी स्वप्नांवर पाणी .व्यापारी व अडतदार यांनी शेतकऱ्यांना सन्मानजनक वागणूक द्यावी. रोख पेमेंटची शिस्त पाळावी. संचालक सोहनलाल भंडारी यांनी लिलावातील समस्या व त्यावरील उपाय याबाबत सूचना सभापती आमदार बनकर यांनी केल्या. शनिवारी (ता.२५) आवकेत वाढ झाली असून ४००० क्विंटल आवक नोंदवली गेली. क्विंटलमागे सरासरी दरात ५० रुपयांची वाढ दिसून आली..Onion Project: कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देणार.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक २७७० क्विंटल झाली. त्यास किमान ४००, कमाल १४१५ व सरासरी ११०० क्विंटल झाली. पहिल्या दिवशी नियमित आवकेच्या तुलनेत ती कमी होती..दरवाढीची अपेक्षा कायमकांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासून दरवाढीच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवला आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्यापही चांगल्या दराची प्रतीक्षा कायम आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अद्यापही समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.