Ethanol Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ethanol Supply : तेल कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा मागणीच्या निम्माच

Ethanol Demand : देशाने मे अखेरपर्यंत सुमारे १२.४८ टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा पार केला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशाने मे अखेरपर्यंत सुमारे १२.४८ टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा पार केला आहे. साखर व धान्य आधारित मिळून इथेनॉलचा तेल कंपन्यांशी झालेला करार ६४७ कोटी लिटरचा होता, यापैकी ३२८ कोटी लिटरचा पुरवठा मे अखेर तेल कंपन्यांना झाला आहे. अजूनही मागणीच्‍या तुलनेत समाधानकारक इथेनॉलचा पुरवठा करण्‍यासाठी इथेनॉल प्रकल्प धडपडत आहेत.

केंद्राने आणलेल्या इथेनॉल प्रकल्पावरील निर्बंधाचे सावट इथेनॉल निर्मिती आणि पुरवठ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. इथेनॉल पुरवठ्याचा भार अजूनही साखर उद्योगावरच असल्याचे इथेनॉल पुरवठ्यावरून दिसत आहे.

फेब्रुवारी अखेर पर्यंत मिश्रणाचे प्रमाण ११.६० टक्के होते. साखर आधारित प्रकल्पामधून २३१ कोटी लिटरचा करार झाला होता. त्‍यापैकी उद्योगातून १६६ कोटी लिटरचा पुरवठा तेल कंपन्यांना झाला.

उसाच्या रसापासून ६४ कोटी लिटर इथेनॉलचा करार होता, त्यापैकी ५४ कोटी लिटरचा पुरवठा झाला. बी-हेवी मोलॅसेस ११३ कोटी लिटरचा करार झाला तर पुरवठा ५४ कोटी लिटरचा झाला आहे. सी हेवी मोलॅसेसच्या माध्यमातून तयार झालेल्या इथेनॉलचा ८२ कोटी लिटरचा करार झाला. तर पुरवठा २८ कोटी लिटरचा झाला.

धान्य आधारित इथेनॉलचा करार ४१६ कोटी लिटरचा झाला होता. यापैकी फक्त १६२ कोटी लिटरचा पुरवठा झाला आहे. यामध्ये खराब अन्नधान्‍यापासूनचा २४५ कोटी करार इथेनॉलपैकी ९६ कोटी इथेनॉलचा पुरवठा झाला आहे. तांदळापासून तयार झालेल्‍या इथेनॉलचा करार २१ कोटी लिटरचा होता. परंतु केंद्राच्या बंदीमुळे तांदळापासून तयार झालेल्या इथेनॉलचा पुरवठा अजिबातच झाला नाही.

सध्या उसाचा हंगाम संपला आहे. बी हेवी, सी हेवी मोलॅसिस पासून अजूनही इथेनॉल तयार होवू शकते. पण साखर आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती पुढील हंगाम सुरू होईपर्यंत थंडावण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत उसाच्या रसापासून इथेनॉलचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त होता.

हंगाम थंडावल्‍यानंतर मात्र पुरवठा कमी झाला. केंद्राने साखर उद्योगावरील इथेनॉल प्रकल्‍पांचा भार कमी करण्यासाठी धान्य आधारित प्रकल्‍पांना प्रोत्‍साहन दिले. गेल्या वर्षी जुलैपासून तांदूळ इथेनॉल उत्पादनासाठी वळवण्यात आलेला नाही. तांदळाच्या किमती वाढू नयेत यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

मक्यापासून इथेनॉल निर्मितीवरही मर्यादा

इथेनॉलच्या उत्पादनासाठी धान्यावर आधारित डिस्टिलरींना अनुदानित तांदळाची विक्री पुन्हा सुरू करण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्रीय अन्न व पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. केंद्राने इथेनॉल निर्मितीला जोर दिला असला तरी कमी उत्पादनामुळे मक्यापासून इथेनॉल निर्मितीवरही मर्यादा येत असल्याचे चित्र सध्या आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT