Ethanol Production : केंद्राच्या निर्बंधांमुळे इथेनॉल निर्मितीत घट

Ethanol Reduction Update : केंद्राने इथेनॉल निर्मितीवर बंधन घातल्याने मागणी इतका पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. देशात मार्च अखेरपर्यंत इथेनॉलचे मिश्रण ११.९६ टक्के वाढले आहे.
Ethanol
EthanolAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : केंद्राने इथेनॉल निर्मितीवर बंधन घातल्याने मागणी इतका पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. देशात मार्च अखेरपर्यंत इथेनॉलचे मिश्रण ११.९६ टक्के वाढले आहे. कमी उत्पादन होऊनही तेल उत्पादक कंपन्यांनी आपल्या शिल्लक साठ्यातील इथेनॉल मिश्रणासाठी वापरले. त्यामुळे २०२३-२४ मध्ये मार्च अखेरपर्यंत २३२ कोटी लिटर इथेनॉलचे मिश्रण पेट्रोलमध्ये झाले.

Ethanol
Ethanol Production : इथेनॉलसाठी ६.७ लाख टन ‘बी हेवी मोलॅसिस’ला परवानगी

इथेनॉल वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत विविध उद्योगांकडून २२४ कोटी लिटर इथेनॉलची प्राप्ती तेल कंपन्यांना झाली, तर मिश्रण २३२ कोटी लिटरचे झाले. मिळालेल्या इथेनॉलपेक्षा आठ कोटी लिटर जादा मिश्रण झाले. याचाच अर्थ तेल कंपन्यांनी आपल्या शिल्लक साठ्यातूनही इथेनॉलचा वापर मिश्रणासाठी केला.

मोलॅसिस आधारित इथेनॉल प्रकल्पांकडून इथेनॉलची मागणी १५२ कोटी लिटरची होती. या मागणीच्या तुलनेत १२६ कोटी लिटर इथेनॉल तेल कंपन्यांना उपलब्ध झाले. उसाच्या रसापासून ५४ कोटी लिटर इथेनॉल उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात पहिल्या पाच महिन्यांत ५२ कोटी लिटर इथेनॉल तेल कंपन्यांना उपलब्ध झाले. बी हेवी मोलॅसिस आणि सी हेवी मोलॅसिसमधून अनुक्रमे ७५ व २३ कोटी लिटर इथेनॉल उपलब्ध होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात अनुक्रमे ६३ आणि १० कोटी लिटर इथेनॉल या घटकांपासून तेल कंपन्यांना पुरविण्यात आले.

Ethanol
Ethanol Production : सरकारचा मोठा निर्णय; इथेनॉल निर्मीतीला दिली परवानगी, साखर कारखानदारांना दिलासा

धान्य आधारित उद्योगांकडून इथेनॉलची मागणी १६८ कोटी लिटरची होती. प्रत्यक्षात धान्य उद्योगांकडून ९८ कोटी लिटर इथेनॉलची उपलब्धता झाली. खराब धान्यापासून ८६ कोटी इथेनॉल उपलब्ध होईल, असा अंदाज होता. यापैकी ४७ कोटी लिटर इथेनॉल उपलब्ध झाले.

केंद्राच्या बंधनांचा नकारात्मक परिणाम

साखर उद्योग व धान्य उद्योगातून एकत्रित इथेनॉल ३२० कोटी लिटर मिळेल, असा अंदाज होता. या तुलनेत २२४ कोटी लिटर इथेनॉल तेल कंपन्यांना दोन्ही उद्योगांकडून मिळाले. केंद्राने साखर उद्योगातील इथेनॉल निर्मितीवर बंधन आणले. तसेच इथेनॉल निर्मितीसाठी अनुदानित तांदळाच्या वापरावरही बंदी घातली आहे. दोन्ही गोष्टींचा नकारात्मक परिणाम जलद गतीने इथेनॉल निर्मिती होण्यावर झाला. त्यामुळेच मागणीच्या तुलनेत पुरेसे इथेनॉल तेल कंपन्यांना मिळू शकले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com