Onion Arrivals
Onion Arrivals  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Arrival : उन्हाळ कांदा आवक संपुष्टात

मुकूंद पिंगळे

नाशिक : चालूवर्षी कांद्याला उत्पादन (Onion Production) खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना अपेक्षित परतावा मिळू शकला नाही, अशी परिस्थिती आहे. जानेवारीच्या पहिल्या सप्ताहात उन्हाळ कांद्याचा साठा (Onion Stock) संपुष्टात आला.

गेल्या डिसेंबर महिन्यापासून खरीप लाल कांद्याची आवक (Onion Arrival) हळूहळू वाढू लागली आहे. मात्र अपेक्षित दर (Onion Rate) मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. सध्या पुरवठा लाल कांद्यावर अवलंबून आहे.

मात्र सरासरी १,२०० रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे गणित बिघडले आहे. त्यामुळे किमान २,००० ते २,५०० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, अशी शेतकरी मागणी करत आहेत.

गत खरिपामध्ये अतिवृष्टीमुळे खरीप लाल कांद्याच्या रोपवाटिकांचे नुकसान, त्यानंतर बुरशीजन्य रोगामुळे यंदाही अनेक शेतकऱ्यांना एकरी उत्पादकता साधता आलेली नाही. प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी लागवडी उभ्या केल्या.

सुरुवातीला उन्हाळा कांद्याच्या तुलनेत नवीन खरीप कांद्याला मागणी वाढल्याने दराने भाव खाल्ला. नोव्हेंबर महिन्यात आवक कमी असताना २ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.

त्यांनतर डिसेंबर महिन्यात दरात घसरण होत गेली. तर जानेवारी महिन्यात क्विंटलमागे ६०० ते ७०० रुपयांनी दरात फटका बसत आहे.

यंदा शेतकऱ्यांचा कांद्यावरील पीक संरक्षण खर्च एकरी दहा हजारांवर वाढला. अशा परिस्थितीत किमान दोन हजार रुपये सरासरी दर मिळाल्यास दोन पैसे होतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.

मात्र सध्याच्या मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा होत आहे. चालुवर्षी दसऱ्यापासून जिल्ह्यातील उमराणे, मुंगसे या बाजार आवारात मुहूर्ताला ११,१११ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

मात्र आवक सुरळीत होऊ लागताच १,२०० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळत आहेत. परिणामी उत्पादकता कमी असूनही शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

खरिपातील लागवड घटली

२०२१-२२ मध्ये खरीप कांद्याची लागवड २९,३३८ हेक्टर झाली होती. तर यंदा २३२९ हेक्टरवर क्षेत्र घटले आहे. २०२२-२३ मध्ये ही लागवड २७,६०९ हेक्टर इतकीच आहे. यंदा हंगामही लांबणीवर गेला आहे.

लासलगाव, येवला, नांदगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार आवारात २० हजार क्विंटलवर लाल कांद्याची आवक होत आहे.

तर सर्वाधिक आवक २८ हजार लासलगाव बाजार समितीत नोंदवली गेली. तर इतर बाजार समित्यांमध्ये ही आवक अद्याप दबावात आहे.

बाजार समितीनिहाय आवक, दर ः

बाजार समिती...किमान...कमाल...सरासरी

लासलगाव...६००...१,६३२...१,४२०

पिंपळगाव बसवंत...८००...१,७००...१२५०

येवला...३००...१,५००...१,२२५

मनमाड...४००...१,४४०...१२५०

चांदवड...६६०...१,५५९...१,३८०

विंचूर(लासलगाव)...८००...१,६७७...१,४५१

मुंगसे (मालेगाव)...३४०...१,५६१...१,२५०

कळवण...४००...१,५६०...१,१५०

नांदगाव...३००...१,४४२...१,१५०

देवळा...५००...१,५३०...१,४५०

उमराणे...७५१...१५२६...१३७०

सटाणा...५१०...१,६१०...१,३५०

सिन्नर...३००...१,४५५...१,३००

(संदर्भ:महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

मध्यंतरी खराब हवामानामुळे कांद्यावर करपा आलेला आहे. त्यामुळे एकरी उत्पादन घटले आहे. मिळणाऱ्या या भावात खर्चसुद्धा निघत नाही. सध्या दर किमान २,००० ते २,५०० पर्यंत मिळाला पाहिजे.

- रघुनाथ खैरनार, कांदा उत्पादक, सायगाव, ता. येवला

मिळणारे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत खूप कमी आहेत. आवकही जानेवारीच्या तुलनेत खूप कमी आहे. परंतु केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरणे कांदा शेतीसाठी मारक आहे. बाहेर देशात मागणी तशी खूप आहे, असा व्यापाऱ्यांचा सुर आहे. दुसरीकडे देशांतर्गत किरकोळ बाजारात चांगले भाव असताना व्यापारी शेतकऱ्यांना तुलनेत खूप कमी भाव देतात.

- शिवाजीराव पवार, कांदा उत्पादक, वाखारी, ता. देवळा.

यावर्षी उन्हाळा कांद्याला संपेपर्यंत भाव नव्हता. आता लाल कांदा चालू आहे; परंतु खर्च खूप झालेला आहे. त्या तुलनेत मालही नाही आणि दरही नाही. शेतकऱ्याची एकंदरीत परिस्थिती कांद्याच्या बाबतीत खूप बिकट आहे. शासनाने हमीभाव द्यावा.

- मनीषा इंगळे, शेतकरी, साकुरी, ता. मालेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Farming : शाश्‍वत शेती पर्यायासाठी ‘चावडी’वर होतेय चर्चा

Pre-Monsoon Rain : वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा जोर कायम

Tulsi Dam Kolhapur : ‘तुळशी’ धरणातील पाणीसाठा ४४ टक्के; पाणी नियोजनासाठी प्रशासनाची कसरत

Land Acquisition : दोनदा भूसंपादनाने वाढला मनस्ताप

Maharashtra Lok Sabha Election : मतदानादिवशी राज्यात गोंधळ, मतदानावर बहिष्कार तर मविआच्या उमेदवाराविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT