Sangli News : क्रांतिअग्रणी कारखान्याच्या गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याकडे निडवा उसाचा पुरवठा केला त्यांना १०० रुपये प्रति टनाप्रमाणे निडवा अनुदान कारखान्यामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले असल्याची माहिती क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी दिली..श्री. लाड म्हणाले, की २०२३ मध्ये अवर्षण परिस्थिती होती. या हंगामात अपेक्षेपेक्षा कमी लागण झाली होती. त्यामुळे गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये उसाचा खोडवा पीक गळीतास आल्यानंतर, निडवा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपीच्या दरापेक्षा प्रति टनास १०० रुपये जादा अनुदान देण्याचे धोरण कारखान्याने जाहीर केले होते..Sugarcane Disease : उसावरील रोगांचा ओळखा प्रादुर्भाव.ते म्हणाले, की खोडवा पिकासाठी ज्या ऊस विकास योजना दिल्या जातात त्याच योजना निडवा पिकासाठी दिल्या. त्यामुळे कारखाना परिसरातील सुमारे ७७८ शेतकऱ्यांनी ३५८ हेक्टरवर निडवा ठेवला..शेतकऱ्यांनी निडवा पीक घेतल्यामुळे कारखान्यास गाळप हंगाम २०२४/२५ मध्ये सुमारे २१ हजार २७८ टन जादा ऊस गाळपासाठी उपलब्ध झाला. या निडवा उसाचे धोरणाप्रमाणे २१.२८ लाख रुपयांचे निडवा अनुदान शेतकऱ्यांना दिले आहे. या उपक्रमामुळे ऊसपिकाचे एकापेक्षा जास्त खोडवा घेण्याची शेतकऱ्यांची मानसिकता तयार होण्यास मदत होणार आहे..Sugarcane Damage: मुसळधार पावसाने ऊस पीक जमीनदोस्त.ऊसपिकामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा व उसाचे एकरी शाश्वत उत्पादन मिळावे म्हणून कारखान्यामार्फत विविध ऊसविकास योजना राबविण्यात येत आहेत. .याशिवाय ऊसविकास कार्यक्रमामध्ये ड्रोनद्वारे फवारणी, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापर अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या वेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन दिगंबर पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे, सचिव विरेंद्र देशमुख, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.