Eggs  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Eggs Rate: अंड्याचे दर पोहोचले ६०० रुपये शेकड्यावर

Eggs Market Update: वाढत्या मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने राज्यासह देशात अंड्यांचे दर चांगलेच तेजीत आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News: वाढत्या मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने राज्यासह देशात अंड्यांचे दर चांगलेच तेजीत आहेत. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीबरोबरच दक्षिणेत कुक्‍कुट मर्तुकीच्या वाढत्या प्रमाणामुळे उत्पादकता कमी झाल्याने तेजी अनुभवली जात आहे.

तमिळनाडूतील नमक्‍कल जिल्हा हा देशभरात अंडी उत्पादनासाठी ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर लेअर कोंबड्यांचे व्यवस्थापन होते. रोजगाराचा हा मोठा स्रोत या भागासाठी ठरला आहे. उत्पादित अंड्यांची विक्री देशभरातील बाजारासोबतच आंतरराष्ट्रीयस्तरावर देखील केली जाते. या भागातून नुकतीच एक कोटी अंडी अमेरिकेला पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

सद्यःस्थितीत प्रत्येक महिन्याला याच भागातून २० कोटी अंड्यांची निर्यात आखाती देशांमध्ये होते. त्यामध्ये यूएई, कतार, ओमान, बहरीन तसेच काही आफ्रिकन देशांचा समावेश आहे. निर्यात वाढल्याने देशभरातील मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम दरावर झाल्याचे सांगितले जाते.

गेल्या काही दिवसांपूर्वीच अंड्याचे दर प्रती शेकडा (१०० नग) साडेचार ते पाच रुपये असा होता. त्यानंतर आता अंड्याचे दर थेट ६०० रुपये शेकड्यांवर पोहोचले आहे. मागणी आणि पुरवठा यात अशीच तफावत राहिल्यास यापुढील काळात अंडी दर आठ रुपये प्रती नग (८०० रुपये शेकडा) पोहचण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रातील रोजची अंड्यांसाठीची मागणी एक कोटीच्या घरात आहे. सध्या राज्यात ९ लाखांवर पोल्ट्री व्यावसायिक असले तरी यातील लेअर पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या अत्यल्प असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच राज्याची अंड्याची गरज भागविणे शक्‍य होत नसल्याने इतर राज्यातून होणाऱ्या आवकेवर अवलंबून राहावे लागते.

अमेरिकेतील निर्यातीसाठी निकष

प्रती अंड्याचे वजन ६० ग्रॅम असावे, त्यासोबतच काही गुणवत्ता प्रमाणपत्राची देखील गरज अमेरिकेतील निर्यातीसाठी असते. नमक्‍कल भागातून २१ वातानुकूलित कंटेनरच्या माध्यमातून १ कोटी अंडी पाठविण्यात आली आहेत. अमेरिकेला अंडी निर्यातीचा हा पहिलाच प्रयत्न होता. तेथील निकषांवर ही खेप योग्य ठरल्यास पुढील निर्यात सुलभ होणार आहे.

ऑक्‍टोबर ते डिसेंबर या थंडीच्या दिवसांत पोषक आहार म्हणून अंड्यांना मागणी असते. या कालावधीत दर तेजीत राहतात, असा दर वर्षीचा अनुभव आहे. सध्या हिवाळ्याच्या दिवसातील दर अंड्यांना मिळत आहे, ही बाब या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी निश्‍चितच दिलासादायक आहे.
अनिकेत कोकाटे, पोल्ट्री व्यावसायिक, नायगाव, दर्यापूर, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT