Eggs Market: अंडी दरात झपाट्याने वाढ, शेकड्याला ५१३ रुपये दर
Amravati News: तापमानातील वाढीच्या परिणामी लेअर कोंबड्यांची अंडी देण्याची कमी होणारी क्षमता, मर्तुकीचे वाढते प्रमाण याचा प्रभाव अंडी उत्पादनावर झाला आहे. उत्पादन कमी आणि तुलनेत मागणी अधिक यामुळे राज्यात सर्वदूर अंडी दरात तेजी अनुभवली जात आहे. गेल्या आठवडाभरात अंडी दरात प्रति शेकडा (१०० नग) ९४ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.
हिवाळा तसेच पावसाळ्यात अन्नघटकांचा स्रोत म्हणून अंड्यांचा आहारातील उपयोग वाढीस लागतो. यातून मागणीत वाढ होत दरही तेजीत राहतात, असा अनुभव आहे. तुलनेत उन्हाळ्याच्या काळात अंडी गरम असल्याच्या कारणाआड मागणी आणि त्याच्या परिणामी दरही कमी राहतात.
यंदा मात्र परिस्थिती याच्या विपरित असल्याचे चित्र बाजारात आहे. ऐन उन्हाळ्यातच राज्यात अंड्यांना मागणी वाढल्याने दरात मोठी सुधारणा झाली आहे. गेल्या आठवडाभराच्या तुलनेत प्रति शेकडा ९४ रुपये इतकी वाढ अंडी दरात झाली आहे. गेल्या आठवड्यात ४१९ रुपये प्रति शेकडा असा अंडी दर होता.
आता हेच दर वधारत ५१३ रुपये प्रति शेकड्यावर पोहोचले आहेत. जून महिनाभर किंवा त्यापुढील काळात अंडी दर स्थिर राहतील, अशी शक्यता पोल्ट्री व्यवसायिक रवींद्र मेटकर यांनी व्यक्त केली. अमरावती जिल्ह्यातदेखील पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या वाढती असून त्यामध्ये लेअर व्यावसायिकांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे नजीकच्या काळात विदर्भात अमरावतीची ओळख पोल्ट्री व्यवसायाचे हब म्हणून होत आहे.
उद्दिष्ट गाठणे अशक्य
राज्याची रोजची अंडी मागणी एक कोटीच्या घरात आहे. राज्यातील सात लाखांवर पोल्ट्री व्यावसायिकांच्या माध्यमातून या मागणीची पूर्तता करण्याचा प्रयत्न होतो. परंतु हे उद्दिष्ट गाठणे शक्य होत नसल्याने आंध्र प्रदेशातूनदेखील अंडी आवक होते. त्यानंतरदेखील मागणी आणि पुरवठा यातील अंतर कमी करता येत नसल्याची स्थिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.