Egg Market : उत्पादन घटल्याने अंड्याचे दर ५०० पार

Egg Rate : राज्यात शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नऊ लाखांच्या घरात आहे. या माध्यमातून ब्रॉयलर चिकन तसेच लेयर पोल्ट्रीधारकांच्या माध्यमातून अंड्यांचे उत्पादन केले जाते.
Egg
EggAgrowon

Nagpur News : तापमानातील वाढीमुळे पोल्ट्री उद्योग क्षेत्रात मरतुकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे राज्यात अंड्याच्या उत्पादनात घट आली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून अवघ्या चार दिवसांत प्रतिशेकडा अंड्याचे दर ३२० रुपयांवरून ५२० रुपयांवर पोहोचले आहेत.

राज्यात शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नऊ लाखांच्या घरात आहे. या माध्यमातून ब्रॉयलर चिकन तसेच लेयर पोल्ट्रीधारकांच्या माध्यमातून अंड्यांचे उत्पादन केले जाते. राज्याची रोजची सरासरी अंड्यांची गरज एक कोटींच्या घरात आहे. या मागणीची पूर्तता राज्यातील लेअर पोल्ट्रीधारकांकडून शक्य होत नाही. त्यामुळे हैदराबाद येथून देखील अंड्यांची आवक राज्यात होते.

Egg
Eggs Rate : अंडी उत्पादन घटल्याने दराने घेतली उसळी

चार दिवसांपूर्वी मागणी आणि आवक याचे प्रमाण समसमान असल्याने दर दबावात होते. त्यामुळेच सरासरी ३२० रुपये प्रति १०० नग या दराने अंड्यांचे व्यवहार होत होते, अशी माहिती अमरावती येथील पोल्ट्री व्यावसायिक रवींद्र मेटकर यांनी दिली. त्यानंतरच्या काळात मात्र मागणी आणि पुरवठा यात मोठी जरी निर्माण झाल्याने अंड्याच्या दरात सुधारणा अनुभवण्यात आली आहे.

Egg
Egg Rate : तापमानात वाढ होत असतानाही अंडी दर टिकून

हैदराबाद येथून आवक होणाऱ्या अंड्यांना सरासरी ४७० ते ४९० रुपये प्रतिशेकडा असा दर मिळत आहे. राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांना ५०० ते ५२० रुपये असा दर प्रतिशेकडा मिळत असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्री शेडवर अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये वरच्या बाजूस स्प्रिंकलर बसविणे तुषार व इतर उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांत तर ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्याचा फटका पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर बसत आहे. तापमानातील वाढीमुळे शेडमधील कोंबड्या मारण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अंडी उत्पादकता प्रभावित झाली असून मागणीची पूर्तता शक्य होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच दरात तेजी येत ते ५०० ते ५२० रुपये प्रतिशेकड्यावर पोहोचले आहेत.
- रवींद्र मेटकर, पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती
राज्यात रोज सरासरी एक कोटीपेक्षा अधिक अंड्यांची मागणी राहते. सध्या तापमानात वाढीच्या परिणामी अंडी उत्पादकता प्रभावित झाली आहे. त्यामुळे दर ५०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. अंडी उत्पादकता खर्च साडेचार रुपये प्रति नग आहे.
- श्याम भगत, समन्वयक नॅशनल एग्ज कॉर्डिनेशन कमिटी, महाराष्ट्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com