Eggs Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Poultry Market : देशभरात अंडीचे दर ६५० रुपयांवरून ५०० रुपयांवर

Egg Rate : थंडीत पौष्टिक घटक म्हणून आहारात अंड्यांना मागणी राहते. त्यामुळे दर वर्षी थंडीच्या दिवसात मागणीत वाढ होत असल्याने दरही तेजीत येतात, असा लेअर पोल्ट्री व्यावसायिकांचा अनुभव आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : थंडीत पौष्टिक घटक म्हणून आहारात अंड्यांना मागणी राहते. त्यामुळे दर वर्षी थंडीच्या दिवसात मागणीत वाढ होत असल्याने दरही तेजीत येतात, असा लेअर पोल्ट्री व्यावसायिकांचा अनुभव आहे. मात्र यावेळी थंडीच्या तीव्रतेत वाढ नोंदविली गेली असताना अंडी मागणी मात्र अपेक्षित नाही. परिणामी, अंडीचे दर पूर्वीच्या ६५० रुपये प्रती हजारांवरून आता थेट ४८० रुपयांवर आले आहेत. देशभरात अशीच स्थिती असल्याची माहिती लेअर पोल्ट्री व्यावसायिक रवींद्र मेटकर यांनी दिली.

थंडी आणि अंडी असे दर वर्षीचे समीकरण राहते. दरातील तेजीचा थंडी हा हंगाम मानला जातो. या वर्षी देखील सुरुवातीला थंडीत वाढ होताच दरांनी चांगलीच उसळी घेत ६५० रुपयांचा पल्ला गाठला. गेल्या काही वर्षातील हा उच्चांकी आणि विक्रमी दर मानला जात होता. यंदा याच दराभोवती अंड्यांचे अर्थकारण राहील, असे मानले जात होते. परंतु ओमानसह काही देशांमध्ये होणारी अंडी निर्यात प्रभावित झाली.

त्यासोबतच राज्यभरातील बाजारांमध्ये भाजीपाला आवक वाढल्याने याचे दरात घसरण झाली. परिणामी आहारात पालेभाज्यांचे प्रमाण वाढीस लागली. अंडी दरातील घसरणीमागे हे देखील एक कारण सांगितले जाते आहे. या सर्व घटकांच्या परिणामी ६५० रुपयांवर गेलेले अंडी दर आता थेट ४८० ते रुपये प्रती शेकड्यांवर स्थिरावले आहेत. त्यापूर्वी अंडी दर ५५० रुपयांपर्यंत खाली आले होते. हा दर देखील दिलासादायक असताना आता मात्र दरातील आणखी घसरणीमुळे लेअर पोल्ट्री व्यावसायिक चांगलेच अडचणीत आले आहेत.

सोयाबीन पेंडचे दर स्थिर

पोल्ट्री उद्योगाची मागणी असल्याने सध्या सोयाबीन पेंडचे दर स्थिर आहेत. बाजारात सोया पेंडचे दर २९ हजार रुपये प्रति क्‍विंटल याप्रमाणे असून त्यावर पाच टक्‍के जीएसटीची आकारणी होते. त्यासोबतच वाहतूक खर्चाचा भार देखील खरेदीदाराला करावा लागतो. त्यामुळे पोल्ट्री उद्योजकांना तीस हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर यापोटी चुकवावा लागत असल्याची माहिती पोल्ट्री उद्योजक रवींद्र मेटकर यांनी दिली. त्यामुळे अंडी उत्पादकता दर अधिक असताना बाजारात मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याची खंत आहे.

असे आहेत सोमवार (ता.६) चे अनुमानित दर (प्रति शेकडा)

कोलकाता - ५३० रुपयांपेक्षा खाली

भोपाळ - ५२० रुपयांपेक्षा खाली

हैदराबाद - ४६० रुपयांपेक्षा खाली

अजमेर - ५०० रुपयांपेक्षा खाली

पंजाब क्षेत्र - ५०० रुपयांपेक्षा खाली

दिल्ली - ५७० रुपयांपेक्षा खाली

अमरावती जिल्ह्याचा विचार करता हा भाग सध्या पोल्ट्री उद्योगाचे हब ठरला आहे. रोज सरासरी सहा लाख अंडी उत्पादन जिल्ह्यात होते. मागणीअभावी दर दबावात असून अनेकांकडे अंडी साठा राहत आहे.
- रवींद्र मेटकर, लेअर पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Legislative Assembly: कृषिमंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ

Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

Guru Pournima 2025: गुरुपौर्णिमेला गुरुकुंजात गुरुदेवभक्तांची मांदियाळी

Pomegranate Price: डाळिंबाच्या एका क्रेटला साडेसहा हजार रुपये दर

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील गैरप्रकार बिहारमध्ये चालू देणार नाही

SCROLL FOR NEXT