Egg Rate : राज्यात अंडीदर पोहचले ६३० ते ६५० रुपयांवर

Egg Market : मागणीच्या तुलनेत कमी होणाऱ्या पुरवठ्यामुळे अंडी राज्याच्या काही भागात ६३० ते ६५० रुपये प्रति शेकडा दराने विकली जात आहेत.
Eggs
Eggs Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : मागणीच्या तुलनेत कमी होणाऱ्या पुरवठ्यामुळे अंडी राज्याच्या काही भागात ६३० ते ६५० रुपये प्रति शेकडा दराने विकली जात आहेत. अंड्यातील तेजी यापुढील काळातही कायम राहील, असा विश्‍वास या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्‍त केला आहे.

राज्यात सुमारे ९ लाखांवर पोल्ट्री व्यावसायिक आहेत. यातील बहुतांश व्यवसाय हे ब्रॉयलर प्रकारातील आहेत. लेअर पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे राज्याची गरज भागविण्याकरिता हैदराबादसह देशाच्या इतर भागांतूनही महाराष्ट्रात अंडी पोहोचतात.

Eggs
Egg Rate : थंडीमुळे अंडी दर पोहोचले ६०० रुपये शेकड्यांवर

राज्याची रोजची अंडी मागणी साधारणपणे एक कोटी इतकी असल्याचे नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटीचे राज्य समन्वयक श्‍याम भगत यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत छोट्या लेअर पोल्ट्री व्यावसायिकांचे अर्थकारण प्रभावित झाले. त्यामध्ये मका दर ३२ रुपये किलोवर गेल्याने पशुखाद्याच्या दरात झालेली वाढ व इतर अनेक प्रकारच्या घटकांच्या दरातील वाढ हे मुख्य कारण सांगितले जाते.

अपेक्षित नफा या व्यवसायातून मिळत नसल्याने अनेक छोट्या लेअर पोल्ट्री व्यावसायिकांनी या व्यवसायातून माघार घेतली. त्यामुळे राज्याची अंडी उत्पादकता देखील प्रभावित झाली आहे. त्यामुळे अंडी दर तेजीत आल्याचे सांगितले जाते. काही महिन्यांपूर्वी ३०० रुपये शेकडा असे अंड्यांचे दर होते. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले होते. आता हे दर ६३० ते ६५० रुपयांवर पोहचले आहेत.

Eggs
Egg Rate : वाढत्या थंडीत अंडी दरात उसळी

त्याच्यासोबतच मका दरही ३२ रुपये किलोवरून २२ रुपयांवर आले आहेत. त्यामुळे प्रति अंडी उत्पादकता खर्चातही कपात झाली आहे. दरम्यान दरही तेजीत आल्याने यापूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई वाढलेल्या दराच्या माध्यमातून काही अंशी करणे शक्‍य झाले आहे. त्यामुळे लेअर पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

दरासह इतर अनेक प्रकारच्या खर्चातील वाढीमुळे छोट्या लेअर पोल्ट्री व्यावसायिकांना या व्यवसायाचे अर्थकारण जुळविणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे त्यांना व्यवसायातून माघार घ्यावी लागली. त्यातूनच अंडी उत्पादन प्रभावित झाले, तुलनेत मागणी वाढली आहे.
रवींद्र मेटकर, लेअर पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती
थंडीमुळे अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातूनच यापूर्वी दबावात असलेल्या अंडी दरात सुधारणा अनुभवली जात आहेत. हे दर यापुढे काहीकाळ स्थिर राहतील. मार्गशीर्ष महिन्यात मागणी कमी झाल्यास त्यात काही अंशी घट होण्याची शक्‍यता आहे.
श्‍याम भगत, महाराष्ट्र समन्वयक, नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com